Last Updated: Monday, August 5, 2013, 11:21
www.24tass.com , झी मीडिया, दुबई धोतर घालून मेट्रो रेल्वे स्थानकात गेलेल्या एका वृध्द भारतीयाला मेट्रोतून प्रवास करण्यापासून रोखल्याचा प्रकार दुबईत घडला.
दुबईतील एतिसलात मेट्रो स्थानकावर रविवारी मधुमती आणि तिचे ६७ वर्षीय वडिल पोहोचले. मात्र पंचिंग गेटजवळील सुरक्षा रक्षकानं त्यांना थांबवलं. वृध्दाने धोतर घातल्यानं त्यांना मेट्रोतून प्रवास करण्याची परवानगी नाही असं कारण देत त्या सुरक्षा रक्षकानं दोघांनाही मेट्रो स्थानकात प्रवेश नाकारला.
मेट्रोतून प्रवास करण्यास दुबईत कोणत्याही प्रकारचा ड्रेस कोड नसल्याचं मधुमती यांनी सांगितलं. याप्रकरणी त्यांनी दुबईतील मेट्रो रेल्वे प्रशासनाकडे तक्रार नोंदवली आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, August 5, 2013, 11:20