Last Updated: Tuesday, July 23, 2013, 09:20
www.24taas.com, झी मीडिया, लंडन इंग्लंडमध्ये राजघराण्याला नवा वारस मिळालाय. नव्या राजपुत्राचा जन्म झालाय. केट मिडलटनने गोंडस बाळाला जन्म दिलाय. प्रिन्स विलियम्स पिता बनल्यानं इंग्लंडमध्ये आनंदोत्सव साजरी होतोय.
नवा राजकुमार मिळाल्यानं ब्रिटनमध्ये जल्लोष आणि आनंदोत्सव सुरु झालाय. ‘डचेज ऑफ केंब्रिज’ केट मिडलटनने गोंडस बाळाला जन्म दिलाय. प्रिन्स विलियम्स पिता बनलेत. राजघराण्याच्या नव्या राजकुमाराच्या जन्माची बातमी येताच प्रत्येकाच्या आनंदाला जणू उधाण आलं.
केटनं लंडनच्या सेन्ट मेरी हॉस्पिटलमध्ये राजपुत्राला जन्म दिला. जगभरातील अनेक देशातील प्रसारमाध्यमं नव्या राजकुमाराच्या आगमनाची प्रतीक्षा करत शाही घराण्यात तळ ठोकून होते. आई आणि बाळ दोघंही सुखरुप असल्याचं बर्किंगहम पॅलेसकडून सांगण्यात आलंय. इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांनीही या आनंदाच्या क्षणी प्रिन्स विलियम्स आणि केट मिडलटन यांचं अभिनंदन केलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, July 23, 2013, 08:05