शाही सुनेची प्रसुती करणाऱ्या टीममध्ये मराठमोळे डॉक्टर! Maharashtrian Doctor assists in Royal Birth

शाही सुनेची प्रसुती करणाऱ्या टीममध्ये मराठमोळे डॉक्टर!

शाही सुनेची प्रसुती करणाऱ्या टीममध्ये मराठमोळे डॉक्टर!
www.24taas.com, झी मीडिया, लंडन

ब्रिटन राजघराण्यातील सून केट मिडलटेन हिने कालच एका गोंडस बाळाला जन्म दिला. याबद्दल संपूर्ण ब्रिटनमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला. केटची प्रसुती करणाऱ्या डॉक्टरांच्या टीममध्ये एक डॉक्टर आहेत मराठमोळे डॉ. सुनीत गोडाम्बे...

डॉ. सुनीत गोडाम्बे मुंबईमध्येच लहानाचे मोठे झाले आहेत. सध्या ते पश्चिम लंडनच्या सेंट मेरी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट नियोनेटोलोजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. १९८८ साली डॉ. गोडाम्बे यांनी नायर हॉस्पिटलमधून एमबीबीएसची पदवी मिळवली होती. काल सुमारे दहा तास प्रसववेदना सहन केल्यावर केटला पुत्ररत्न प्राप्त झालं.

३१ वर्षीय डचेस ऑफ केम्ब्रिजच्या देखरेख महाराणी एलिजाबेथ द्वितीयची पूर्व स्त्री रोग तज्ज्ञ मार्कस सेशेलच्या अध्यक्षतेखाली डॉक्टरांची टीम करत होती. याच सेशेलच्या टीममध्ये डॉ गोडाम्बे हेदेखील होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, July 23, 2013, 21:10


comments powered by Disqus