Last Updated: Monday, September 2, 2013, 13:58
www.24taas.com , झी मीडिया, वॉशिंग्टनभारतातले मसाले हे देशातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहे. ज्या मसाल्यांच्या शोधात निघालेल्या कोलंबसला भारताचा शोध लागला. त्याच भारतीय मसाल्यांना सध्या अमेरिकेत अडवण्यात येतंय.
अनेक प्रकारचे भारतीय मसाले परदेशात विक्रीसाठी जातात. अमेरिकेत तर त्यांना खूप मागणी असते. मात्र एका वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार अन्नविषबाधेला कारणीभूत ठरणारे सॅलमोनेला व्हायरस भारतीय मसाल्यांमधून आले असावे या भीतीनं सध्या अमेरिकेच्या विमानतळांवर भारतीय मसाल्यांना अडवण्यात येतंय. मसाल्यांची कसून चौकशीही करण्यात येतेय.
सॅलमोनेला व्हायरसचा प्रादूर्भाव मसाल्यांसोबतच मासे, बीफ, चिकन, अंडी, दूध आणि भाज्यांमधूनही होतो, असं अमेरिकेच्या फेडरल ड्रग्स अॅडमिनिस्ट्रेशनचं म्हणणं आहे. विषबाधेच्या भीतीनंच एफडीएननं भारतातल्या २०० अन्न उत्पादक कंपन्यांना काळ्या यादीत टाकलंय. त्यात मसाला कंपन्यांचाही समावेश आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, September 2, 2013, 13:52