पाकमध्ये बॉम्बस्फोटात १२ ठार, Blast in Pakistan

पाकमध्ये बॉम्बस्फोटात १५ ठार

पाकमध्ये बॉम्बस्फोटात १५ ठार
www.24taas.com,इस्लामाबाद

पाकिस्तानमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात १५ ठार तर १२ जण जखमी झालेत. वायव्य पाकिस्तानमधील लोअर दीर परिसरात रस्त्याच्या कडेला पेरून ठेवलेल्या स्फोटकांमुळे हा स्फोट झाला.

लोअर दीर परिसरात आज सकाळी जोरदार स्फोट झाला. यात १५ जण जागीच ठार झाले. १२ जण जखमी असून त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

अफगाणिस्तानच्या सीमेवरील बाजारपेठेत जात असलेल्या नागरिकांचा ट्रक रस्त्याच्या कडेला पेरून ठेवलेल्या बॉम्बवरून गेल्याने हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे.

First Published: Sunday, September 16, 2012, 15:40


comments powered by Disqus