Last Updated: Wednesday, July 17, 2013, 19:09
www.24taas.com,झी मीडिया,अबुजापश्चिम आफ्रिकेच्या गॅबन या तटाजवळ समुद्री चाच्यांकडून तेलवाहू जहाजाचे अपहरण करण्यात आलंय. या जहाजात २४ भारतीय खलाशी असल्याची अशी माहिती सूत्रांनी दिली.
गॅबनमधील जेंटील बंदराच्या अवघ्या पंधरा मैल अंतरावरून तुर्कस्तानच्या जहाजाचं अपहरण करण्यात आलयं. ‘एम व्ही कॉटन’ असे जहाजाचे नाव असून संशयित समुद्री चाच्यांनी या जहाजाचं अपहरण केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. हे जहाज अपहरण करण्यामागे चाच्यांचा काय हेतू आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
"कंपनीच्या धोरणामध्ये जहाज आणि खलाशांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य आहे. याप्रमाणे खलाशी सुखरूप रहावेत, यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत,`` असे कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलंय. यासंदर्भात तुर्कस्तान सरकार व इतर सर्व संबंधित संस्थांना माहिती देण्यात आली असून खलाशांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितलयं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, July 17, 2013, 19:04