बुडालेल्या जहाजातून 28 किलो सोनं बाहेर काढण्यात यश

Last Updated: Wednesday, May 7, 2014, 16:58

अमेरिकेत सर्वात दुर्देवी घटनेत दक्षिण कॅरोलीनात 1857 साली एक जहाज बुडालं होतं. या जहाजातून 28 किलो सोनं बाहेर काढण्यात यश आलं आहे.

`सिवोल` जहाज दुर्घटनेच्या मृतांची संख्या वाढली

Last Updated: Sunday, April 20, 2014, 18:47

दक्षिण कोरियाच्या जलरक्षकांनी समुद्रात बुडालेल्या जहाजातून १० अजून मृत शरीरे बाहेर काढले आहेत.

जहाज दुर्घटना : मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Last Updated: Thursday, April 17, 2014, 11:59

दक्षिण कोरियाच्या दक्षिण समुद्रात एका जहाजाला जलसमाधी मिळाली.

द. कोरियात जहाज पलटल्यानं 476 प्रवासी बुडाले, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

Last Updated: Wednesday, April 16, 2014, 10:09

दक्षिण कोरियाच्या दक्षिण तटावर जहाज समुद्रात पलटलंय. त्यामुळं जहाजात असलेल्या 476 प्रवाशांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी तटरक्षक जहाजं आणि हेलिकॉप्टर कामाला लागले आहेत. जहाजामधील प्रवाशांमध्ये जास्तीत जास्त शाळेचे विद्यार्थी आहेत. तटरक्षक दलाच्या एका प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार जहाज समुद्रात उतरलं आणि पाण्यात बुडालं.

नेव्हीच्या जहाजाची बोटीला धडक

Last Updated: Tuesday, December 24, 2013, 18:59

नेव्हीच्या जहाजाने धडक दिल्याने समुद्रात मच्छिमारी करणाऱ्या अलसौबान या बोटीला जलसमाधी मिळालीय. काल रात्री ही घटना दापोली तालुक्यातल्या हर्णे बंदरात घडलीय. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

`सी ड्रीम`... समुद्र सफरीचं स्वप्न सत्यात!

Last Updated: Monday, October 28, 2013, 17:58

जगभरात नावाजलेली ‘सी ड्रिम’ या लॅवीश जहाजाचं मुंबईत आगमन झालं. नऊ मजल्याचं हे आलिशान जहाज पहिल्यांदाच भारतात आलंय. ११२ विदेशी पर्यटकांना घेऊन जहाज मुंबई, गोवा आणि कोचीन असा प्रवास करणार आहे.

समुद्रातून मिळाला दोन कोटींचा खजिना

Last Updated: Sunday, September 8, 2013, 20:01

तब्बल दोन कोटींचे सोने समुद्रात सापडल्याने एका सामान्य कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ही बातमी समोर येताच सर्व देशाला आश्चर्याचा धक्का बसलायं.

‘आयएनएस विक्रांत’ची चीनला भरली धडकी

Last Updated: Wednesday, August 21, 2013, 11:43

भारतीय बनावटीनं बनलेलं विमानवाहू जहाज ‘आयएनएस विक्रांत’ आणि ‘जापानचं हेलिकॉप्टर’ सैन्यात सहभागी केल्यानं चीनला धडकी भरलीय. चीनमधील मीडियात आलेल्या एका बातमीत असा आरोप करण्यात आलाय की, काही देश चीनचं सामर्थ्य संतुलित करण्यासाठी भारताचं समर्थन करत आहेत.

२४ भारतीयांसह चाच्यांकडून जहाजाचे अपहरण

Last Updated: Wednesday, July 17, 2013, 19:09

पश्चिम आफ्रिकेच्या गॅबन या तटाजवळ समुद्री चाच्यांकडून तेलवाहू जहाजाचे अपहरण करण्यात आलंय. या जहाजात २४ भारतीय खलाशी असल्याची अशी माहिती सूत्रांनी दिली.

भरकटलेल्या जहाजाचं गुढ उकललंय!

Last Updated: Tuesday, June 11, 2013, 13:55

रत्नागिरीतल्या समुद्रात भरकटलेल्या जहाजाचं अखेर गुढ उकललंय. इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं हे जहाज रत्नागिरीच्या मिऱ्या बंदरच्या समुद्रात विसावलंय. रविवारी हे जहाज समुद्रात दिसल्या नंतर अनेक अफवा उठल्या होत्या. मात्र आता या जहाजात संशयास्पद असं काहीच नसल्याचं स्पष्ट झालंय.

मुंबई किनाऱ्यावर संशयास्पद जहाज

Last Updated: Thursday, April 25, 2013, 22:02

मुंबईच्या समुद्र किना-यापासून अवघ्या २२ किलोमीटर अंतरावर समुद्रात एम. एस. व्ही . युसुफी हे जहाज होतं. एका फोन कॉलमुळेच ते जहाज नौदलाच्या हाती लागलं आणि त्यातील बकऱ्यांचं रहस्य समोर आलं.

मुंबई समुद्रात जहाजाला आग, २२ जण अडकलेत

Last Updated: Monday, September 10, 2012, 09:57

एम. व्ही. एमस्टरडॅम या मालवाहू जहाजाला मुंबईजवळ भर समुद्रात आग लागलीय. कोलंबोकडे जाणारे जहाज मुंबईपासून साधारण पाच किलोमीटरवर असताना ही आग लागली. या जहाजावर २२ जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

परदेशी जहाजाचे चाच्यांकडून अपहरण

Last Updated: Saturday, May 12, 2012, 13:26

कच्च्या तेलाच्या ग्रीक कंपनीच्या टँकरसह एका जहाजाचे अरबी समुद्रातून अपहरण करण्यात आल्या माहिती देण्यात आली आहे. हे जहाज तुर्कीहून सोमालियाकडे जात असताना ओमानच्या पूर्वेस ३०० सागरी मैल अंतरावर त्याचा संपर्क तुटला.

ऑर्नेस्टोनेंच पत्नीला गिफ्ट, ७४० कोटींचे जहाज

Last Updated: Saturday, March 10, 2012, 16:41

माजी ब्रिटन सुंदरी क्रिस्टी रोपरला तब्बल ७४० कोटी रुपये किमतीची ‘वावा- टू’ ही महागडी यॉट (जहाज) भेट देण्यात आली आहे. ही भेट दिली आहे, खुद पतीराज ऑर्नेस्टोने यांनी. ऑर्नेस्टोने हे लंडनमधील अब्जाधीश आहेत. त्यांचा ब्रिटनमध्ये श्रीमंतीत ८१ वा क्रमांक लागतो.

ऑस्ट्रेलियात जहाजाला जलसमाधी

Last Updated: Thursday, February 2, 2012, 13:41

ऑस्ट्रेलियात जवळपास ३५० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या जहाजाला जलसमाधी मिळाल्याची भिती वर्तविण्यात आली आहे. या वृत्ताला ऑस्टेलियाचे पंतप्रधान जुलिया गिलर्ड यांनी दुजोला दिला आहे. ही घटना पपुआ नवी गुईनी येथे घडली.

३००हून अधिक भारतीयांना वाचवण्यात यश

Last Updated: Wednesday, January 18, 2012, 17:26

टायटॅनिकनंतर इटलीमध्ये कोस्टा कॉनकार्डीया अपघातामुळे सगळेच हादरले. पण या आपघातातल्या अनेकांना वाचवण्यात यश आलय, तसच ३००हून अधिक भारतीयांनाही वाचवण्यात यश आलं आहे.

अटलांटिक समुद्रात कोल्हापुरचा तरूण बेपत्ता

Last Updated: Wednesday, January 18, 2012, 08:52

कोल्हापूरमधील सदरबझार परिसरात राहणारा रिचर्ड रॉड्रीक्स हा तरूण जहाजावरून पडून गायब झाला आहे. २४ वर्षांचा रिचर्ड रॉयल कॅरिबियन शिपिंग कंपनीत हाऊसकीपर म्हणून कामाला होता.

बुडालेल्या जहाजावरील नायगावचा रसेल बेपत्ता

Last Updated: Tuesday, January 17, 2012, 13:22

इटलीत समुद्रात बुडालेल्या कोस्टा कॉन्कोर्डिया प्रवासी जहाजावरील सर्व वसईकर कर्मचारी सुखरूप असल्याची बातमी आली खरी. मात्र, नायगावच्या मरियमनगर भागातील रसेल रिबेलो हा ३३ वर्षीय युवक अजूनही बेपत्ताच आहे.

जहाजाच्या अपघातात १३० भारतीय बचावले

Last Updated: Monday, January 16, 2012, 12:56

इटलीच्या तस्कान किनाऱ्यावर जहाज दगडावर आदळल्यानं मोठा अपघात झाला आहे. यात दोन फ्रेंच प्रवासी आणि एका पेरुच्या क्रू मेंबरचा भितीनं समुद्रात उडी टाकल्यानं मृत्यू झाला आहे. या जहाजात १३० भारतीय प्रवाशांसह ४ हजार दोनशे प्रवासी होते.

१३ भारतीय सदस्यांची सुटका

Last Updated: Tuesday, January 10, 2012, 15:56

फेब्रुवारी २०११ मध्ये मलेशियामध्ये सोमालियन चाच्याकडून एम.टी.सावीना कायलिन या अपहरण करण्यात आलेल्या जहाजातील १३ भारतीय सदस्यांची सुटका करण्यात आलीय़.

'एमव्ही पॅव्हिट' लिलावात

Last Updated: Saturday, October 29, 2011, 10:14

मुंबईच्या समुद्रात अडकलेल्या एम.व्ही पॅवित जहाजाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढच्या महिन्यात या जहाजाची लिलावाद्वारे विक्री केली जाणार आहे. मात्र, हे जहाज समुद्रातून बाहेर काढण्यासाठी तब्बल 3.5 कोटी रूपये खर्च आला होता.

बुडालेल्या जहाजाने केली संशोधकांची ‘चांदी’

Last Updated: Sunday, October 9, 2011, 13:25

अमेरिकेतल्या एका शोध पथकाला समुद्रतळाशी जलसमाधी घेतलेल्या ब्रिटीश जहाजातून प्रचंड प्रमाणात चांदीचा खजिना सापडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या खजिन्याची किंमत सुमारे १५ कोटी पौडांपर्यंत जाऊ शकते.