Last Updated: Sunday, February 17, 2013, 15:49
www.24taas.com,इस्लामाबादपाकिस्तान काल शक्तिशाली बॉम्बस्फोटांने हादरले. या स्फोटात आतापर्यंत ८१ जणांचा बळी गेला आहे. बलुचिस्तान प्रांताची राजधानी असलेल्या क्वेट्टा शहराजवळ भीषण बॉम्बस्फोट झाला. या स्फोटाची जबाबदारी लष्कराने स्वीकारली आहे.
या स्फोटात सुमारे १६४ जण जखमी झाल्याचे असून अल्पसंख्यक शिया समुदायाला लक्ष्य ठरवून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
हजारा उपनगरात किराणी मार्गावर येथे शिया हजारा समुदायाचे लोक एकत्र आले होते. या गर्दीचा लाभ उठवत बॉम्बस्फोट घडवून आणला. वाहनात दडवून ठेवलेल्या बॉम्बचा रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने स्फोट घडविण्यात आला. त्यामुळे जिवितहानी झाली.
या स्फोटात दोन मजली इमारत जमीनदोस्त झाली. अनेक जण ढिगार्याखाली दबले गेल्याने मृतांची संख्या वाढली. स्फोटासाठी सुमारे एक क्विंटल स्फोटकांचा वापर झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. लष्कर-ए-जहांगीर या बंदी असलेल्या संघटनेने या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे.
First Published: Sunday, February 17, 2013, 15:48