प्रियकराने जिवंत अजगराने प्रेयसीला झोडपून काढलं, Boyfriend beats Girlfriend with python

प्रियकराने जिवंत अजगराने प्रेयसीला झोडपून काढलं

प्रियकराने जिवंत अजगराने प्रेयसीला झोडपून काढलं
www.24taas.com, न्यूयॉर्क

प्रियकर प्रेयसीमध्ये होणारी भाडणं ही काही नवी गोष्ट नाही... मात्र आपल्या प्रेयसीला एका माथेफिरू प्रियकराने चक्क जिवंत अजगराने झोडपून काढलं आहे. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली तर अजगराचा मात्र मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

वेस्ट स्प्रिंगफील्ड येथील ३४ वर्षीय कीथ पॅरोचे त्याच्या प्रेयसीसोबत जोरादार भांडण झाले. रागाच्या भरात कीथने मागचा पुढचा विचार न करता चार फुटाचा जिवंत अजगराने प्रेयसीला जबर मारहाण केली. तिचा चेहरा गरम पाण्याच्या टबमध्ये बुडविला.

एवढेच नाही तर तिला शिडी मारून फेकली. यात पीडित तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्या पोटावर तसेच पाठीवरही वळ उमटले आहेत. आरोपी कीथवर आपल्या प्रेयसीला मारहाण केल्याचा आणि अजगराची हत्या केल्याचा आरोप ठेवण्‍यात आला आहे. येत्या २७ नोव्हेंबरला याबाबत सुनावणी होणार आहे.


First Published: Friday, November 9, 2012, 21:21


comments powered by Disqus