Last Updated: Thursday, January 17, 2013, 16:46
www.24taas.com, लंडनतुमचं इंग्रजी उत्तम आहे का? तुम्हाला इंग्रजीत पत्रलेखन करता येतं का?... यासारखे प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे ब्रिटनच्या महाराणीला सध्या एका पत्रलेखकाची अवश्यकता आहे. आणि हे पत्र लेखन करणाऱ्या व्यक्तीस वर्षाला सुमारे १७ लाख रुपये पगार देण्यात येणार आहे.
ब्रिटनच्या महाराणीकडे ई-मेल्सद्वारेच नव्हे, तर पारंपरिक पद्धतीनेही पत्रव्यवहार केला जातो. यासाठी राजघराण्याला सध्या एका पत्र लेखकाची गरज आहे. या पत्र लेखकाचं इंग्रजी उत्तम असावं. मोठ्या संख्येने महाराणींना येणारी पत्रं त्याने कमीत कमी वेळेत वाचावीत, त्यांचा योग्य अर्थ लक्षात घेऊन त्यांना उत्तर लिहून पाठवावीत. ई-मेल्सना देखील तितक्याच संवेदनशीलतेने हाताळावं.
सामान्य जनतेकडून येणाऱ्या पत्रांची दखल घेऊन त्यांना उत्तर पाठवावीत. याशिवाय कितीही कामाचा ताण असला, तरी शांतपणे त्याने काम करावं. कामात सातत्य असावं. सर्व पत्रांचे व्यवहार वेळेत व्हावेत. पत्रांसाठी हव्या त्या लेखनशैलीचा वापर करता येऊ शकेल, अशी माहिती रॉयल वेबसाईटवर दिली गेली आहे. या कामासाठी वर्षाकाठी १७ लाख रुपये असा घसघशीत पगार मिळणार आहे.
First Published: Thursday, January 17, 2013, 16:28