टायटानिकपेक्षा दुप्पट मोठं जहाज पुन्हा उभं राहिलं!, Costa Concordia salvage

टायटानिकपेक्षा दुप्पट मोठं जहाज पुन्हा उभं राहिलं!

टायटानिकपेक्षा दुप्पट मोठं जहाज पुन्हा उभं राहिलं!
www.24taas.com, झी मीडिया, लंडन

टायटानिकपेक्षा दुप्पटीने मोठं असलेलं कोस्टा कॉन्कॉर्डिया जहाज तब्बल २० महिन्यांनंतर समुद्राबाहेर येणार आहे. २०१२ साली इटलीच्या गिग्लियो बेटावर एका दुर्घटनेनंतर हे जहाज आडवं पडलेलं होतं.

टायटानिक जहाजापेक्षा दुप्पट वजनाचं हे जहाज... १,१४,००० टनांचं वजन असणारं... लांबी, फूटबॉलच्या तीन मैदानांच्या बरोबरीची... या जहाजाला सरळ करण्यासाठी लोखंडांच्या मोठमोठ्या साखळ्या आणि तारा वापराव्या लागल्या. इंजिनिअर्सच्या मदतीनं या जहाजाला आता पुन्हा सरळ उभं करण्यात आलंय.

सोमवारी सकाळी या जहाजाला पुन्हा उभं करण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. हे तज्ज्ञांसाठीही मोठं आव्हान होतं. एव्हढं मोठं जहाज पुन्हा उभं करण्याची इंजिनिअर्ससाठीही ही पहिलीच वेळ होती. या जहाजाला खेचून समुद्र तटावर आणण्यात आलंय. या मोहिमेसाठी तब्बल तब्बल ६० कोटी युरोंचा खर्च आलाय.

दुर्घटनेच्या वेळी या जहाजात ४,२०० जण प्रवास करत होते. या दुर्घटनेत ३२ जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातासाठी पाच जणांना दोषी करार दिलं गेलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, September 17, 2013, 16:09


comments powered by Disqus