‘निर्भया’ला अमेरिका करणार सन्मानित, Delhi will be honored for his bravery victim Gangrep U.S.

‘निर्भया’ला अमेरिका करणार सन्मानित

‘निर्भया’ला अमेरिका करणार सन्मानित
www.24taas.com, नवी दिल्ली

गतवर्षी सामूहिक बलात्काराची शिकार झालेल्या पिडीत तरुणीला (‘निर्भया’) शौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यासाठी अमेरिकाने पुढाकार घेतला आहे. याचबरोबर दहा महिलांचाही सन्मान करण्यात येणार आहे. दरम्यान, आपल्या मुलीचा अमेरिका गौरव करणार असल्याने तिच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केलाय.

दिल्लीत गेल्या वर्षी चालत्या बसमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. याच्या विरोधात संपूर्ण देशातून संताप आणि चिड व्यक्त करण्यात येत होता. पिडीत मुलीचा सिंगापूर येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

८ मार्च या महिला दिनाच्यावेळी जगातील १० बहादुर महिलांनाही गौरविण्यात येणार आहे. यात पिडीत तरुणीला अमेरिका शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहे. हा पुरस्कार अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांची पत्नी मिशेल आणि विदेश मंत्री जॉन केरी प्रदान करणार आहेत.

‘निर्भया’ला पुरस्कार देण्याची घोषणा अमेरिकेने केल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे आम्ही खूश आहोत, असे तिच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.

या पिडीत मुलीच्या भावाने पीटीआयला सांगितले की, हा तिच्यासाठी गौरव आहे. तिच्या बलिदानामुळे जगातील बलात्कारसारख्या घटना रोखण्यासाठी एक विचाराबरोबरच जबाबदारी वाढलेय.

First Published: Tuesday, March 5, 2013, 14:38


comments powered by Disqus