Last Updated: Friday, December 20, 2013, 11:13
www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टनन्यूयॉर्कमधील भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्याशी झालेल्या कथित गैरवर्तणुकीसंदर्भात अमेरिकेने माफी मागावी, तसेच त्यांच्यावर आरोप मागे घ्यावे या भारताच्या मागण्या फेटाळून लावल्या आहे. देवयानी यांना गेल्या आठवड्यात न्यूयॉर्कमध्ये अटक करण्यात आली होती.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्ता मेरी हर्फ यांनी सांगितले की, देवयानी यांच्यावरील आरोपांना आम्ही खूप गंभीरतेने घेतले आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही मागे हटणार नाही. हा कायद्याच्या पालनाचा मुद्दा आहे. देवयानी यांना सोडण्यात येईल आणि त्याच्यावरील सर्व आरोप मागे घेण्यात येतील का, या प्रश्नावर हर्फ यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, December 20, 2013, 11:13