देवयानीप्रकरणी अमेरिकेच्या कंपन्या टार्गेट, मुंबईत पिझ्झा पार्लरची तोडफोड

Last Updated: Friday, December 20, 2013, 15:43

देवयानी खोब्रागडेंना वाईट वागणूक देणा-या अमेरिकन यंत्रणांवरचा राग आता अमेरिकन कंपन्यांवर निघू लागलाय. वांद्रे इथं रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी डॉमिनोजच्या पिझ्झा पार्लरमध्ये हंगामा करून तोडफोड केली. अमेरिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी डॉमिनोजमध्ये धिंगाणी घातला.

देवयानी प्रकरणः अमेरिकेचा अडेलतट्टूपणा कायम

Last Updated: Friday, December 20, 2013, 11:13

न्यूयॉर्कमधील भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्याशी झालेल्या कथित गैरवर्तणुकीसंदर्भात अमेरिकेने माफी मागावी, तसेच त्यांच्यावर आरोप मागे घ्यावे या भारताच्या मागण्या फेटाळून लावल्या आहे. देवयानी यांना गेल्या आठवड्यात न्यूयॉर्कमध्ये अटक करण्यात आली होती.

देवयानीप्रकरणी अमेरिकेची दिलगिरी, भारत अधिक आक्रमक

Last Updated: Thursday, December 19, 2013, 18:35

अमेरिकेतील भारतीय उच्चायुक्त कार्यालयातील वरिष्ठ महिला अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेत दिलेल्या अपमानास्पद वागणुकीविरोधात त्यांचे वडील उत्तम खोब्रागडे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. मुलीला न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषणाचा इशारा त्यांनी दिलाय. तर भारताने अधिक आक्रमक पवित्रा घेतला आहे. आधी माफी मागा, असे म्हटले आहे.

देवयानी प्रकरणी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केला खेद

Last Updated: Thursday, December 19, 2013, 09:19

न्यूयॉर्कमधील भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना करण्यात आलेली अटक आणि देण्यात आलेली अपमानास्पद वागणुकीबाबत अमेरिकेनं अखेर माफी मागितलीय.

अमेरिकेचा उर्मटपणा कायम, देवायनींचा मेल

Last Updated: Thursday, December 19, 2013, 07:36

अमेरिकेतील भारतीय दुतावास कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी डॉ. देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेत देण्यात आलेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल भारतामध्ये संतापाची लाट उसळलीय. परंतु तरीही अमेरिकेचा उर्मटपणा अद्याप कमी झालेला नाही. झाल्या प्रकाराबद्दल माफी मागण्याऐवजी अमेरिकेने चक्क या कृत्याचं समर्थन केलंय.

देवयानी खोब्रागडे यांची युएनमध्ये कायमस्वरूपी बदली

Last Updated: Wednesday, December 18, 2013, 18:08

अमेरिकेत अपमानित झालेल्या देवयानी खोब्रागडेंची युएनमध्ये कायमस्वरूपी बदली करण्यात आली आहे. या बदलीमुळे त्यांना संपूर्ण राजनैतिक अधिकार प्राप्त झाले आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं त्यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत.

अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना ओळखपत्र परत करण्याचे आदेश

Last Updated: Tuesday, December 17, 2013, 14:31

अमेरिकेच्या भारतीय राजनैतिक महिला अधिकाऱ्याला दिलेल्या या अपमानास्पद वागणुकीनंतर भारतानं अमेरिकेला भारतात तैनात केलेल्या आपल्या सगळ्या राजनैतिक अधिकाऱ्यांची ओळखपत्र परत करण्याचे आदेश दिलेत.

डॉ. देवयानी खोब्रागडे यांची अमेरिकेत कपडे उतरवून चौकशी

Last Updated: Tuesday, December 17, 2013, 13:03

भारताच्या राजनैतिक अधिकारी डॉ. देवयानी खोब्रागडे यांची चक्क कपडे उतरवून चौकशी करण्यात आली. शिवाय अट्टल गुन्हेगार असलेल्या तुरूंगात ठेवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत भारताने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, अमेरिकेच्या शिष्टमंडळास भेट देण्याचे भारताने टाळले आहे.