Last Updated: Tuesday, December 17, 2013, 14:31
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली भारत आणि अमेरिका या दोन देशांमधल्या तणावात भारताच्या राजनैतिक अधिकारी डॉ. देवयानी खोब्रागडे यांची चक्क कपडे उतरवून चौकशी करण्यात आल्याच्या बातमीनंतर आणखीनच भर पडलीय. अमेरिकेच्या भारतीय राजनैतिक महिला अधिकाऱ्याला दिलेल्या या अपमानास्पद वागणुकीनंतर भारतानं अमेरिकेला भारतात तैनात केलेल्या आपल्या सगळ्या राजनैतिक अधिकाऱ्यांची ओळखपत्र परत करण्याचे आदेश दिलेत.
अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना भारतात मिळणाऱ्या सूट आणि लाभांच्या समीक्षा यानिमित्तानं होतेय. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारनं अमेरिकेला भारतात तैनात असलेल्या आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना दिली गेलेली ओळखपत्र परत करण्यास सांगितलंय.
गेल्या आठवड्यात भारताच्या राजनैतिक अधिकारी डॉ. देवयानी खोब्रागडे यांची चक्क कपडे उतरवून चौकशी करण्यात आली. शिवाय अट्टल गुन्हेगार असलेल्या तुरूंगात ठेवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत भारताने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तसंच अमेरिकन राजदूत नैन्सी पॉवेल यांच्यावर ‘डिमार्शे’ही जारी करण्यात आलं होतं.
डॉ. देवयानीयांची पोलिसांनी कपडे उतरवून चौकशी केली. यामुळे अमेरिकेत भारतीय नागरिकांना मिळणाऱ्या वागणुकीचे चित्र पुढे आलंय. याचा निषेध म्हणून आज केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, काँग्रेसचे राहुल गांधी यांनी अमेरिकन शिष्टमंडळाची भेट नाकारली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, December 17, 2013, 14:30