Last Updated: Tuesday, March 26, 2013, 13:40
www.24taas.com,इस्लामाबादपाकिस्तानमध्ये चार वर्षांनंतर माघारी परतलेले माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना ठार मार आणि मिळवा कोटी रूपये, अशी बक्षिसाची घोषणा जमहूरी वतन पार्टीचे अध्यक्ष नवाबजादा तलाल अकबर बुगटी यांनी केली आहे.
ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग पक्षाचे संस्थापक मुशर्रफ तीन दिवसांपूर्वी मायदेशी परतले आहेत. त्यांना जो कोणी ठार करेल त्याला १०० कोटींचे इनाम देण्यात येईल, असे नवाबजादा बुगटी यांनी पुन्हा जाहीर केले. याबाबतची घोषणा त्यांनी एका पत्रकार परिषदेत केली.
बुगटी यांनी धक्कादायक विधान केलेय. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगावर माझा विश्वास नाही. सरकारने देशांतर्गत विस्थापित बुगटी समाजाच्या स्थैर्यतेच्या गंभीर मुद्द्यावर कोणतीही पावले उचलली नाहीत, असे ते म्हणालेत. दरम्यान, पाकिस्तानच्या विविध भागांत राहणाऱ्या बुगटी निर्वासितांची यादी तयार व्हावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
निर्वासितांचा प्रश्न न सोडवता सरकार न्यायालयाचा अवमान करते. याबाबत नवाझ शरीफ यांच्यासोबत बैठकही झाली असून, त्यांनी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे, असेही बुगटी यांनी सांगितले.
First Published: Tuesday, March 26, 2013, 13:40