Last Updated: Monday, April 7, 2014, 19:55
www.24taas.com, वृत्तसंस्था, लंदनएखाद्या दुखावलेल्या महिलेपेक्षा कोणी जास्त धोकादायक नसतं हे पुराणकाळापासूनच बोललं जातंय. असाच काहीसा धक्कादायक प्रकार ब्राझिलमध्ये घडला. एका माणसाला महिलेसोबत लग्न मोडण्याचा निर्णय चांगलाच महागात पडला. त्याला त्याचा प्रायव्हेट पार्ट त्यामुळं गमवावा लागलाय.
ब्राझिलची मरियम प्रिशिला कास्त्रो ही व्यवसायानं डॉक्टर असलेल्या महिलेनं तिच्या होणाऱ्या नवऱ्याला लग्न करायला नकार दिल्यानं चांगलाच धडा शिकवला. तिनं एका गुंडांच्या टोळीला त्याचे लिंग कापण्यासाठी पैसे दिले. १० वर्षांपासून फरार असलेल्या या महिलेला अटक करण्यात ब्राझील पोलिसांना यश मिळालंय. प्रिशिला कास्त्रोला ६ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय.
लग्नाच्या अवघ्या काही दिवसांपूर्वी तिच्यासोबत लग्न करण्यास या व्यक्तीनं नकार दिला होता. व्यवसायानं डॉक्टर आणि श्रीमंत घरातली कास्त्रो यामुळं दुखावली गेली होती. तिनं मग चक्क त्याला धडा शिकवण्यासाठी हे पाऊल उचललं. तिच्यावर हा सुद्धा आरोप आहे की कास्त्रोनं गुंड्यांना त्याची कार तोडण्यासाठी आणि घर जाळण्यासाठीही पैसे दिले होते. या तीन आरोपींना कोर्टात नेण्यात आलं तेव्हा त्यांनी कास्त्रोबद्दल ही माहिती दिली.
ही घटना २००२मध्ये घडली होती. त्यावेळी अटक झाल्यानंतर कास्त्रोची जामीनावर सुटका झाली. त्यानंतर ती फरार झाली. २०१२मध्ये तिला याबाबत शिक्षाही सुनावण्यात आली होती. यादरम्यान ती बीचवरील एका लहान घरात राहत होती. तिनं लग्नही केलं होतं. मात्र आता तिला अटक करण्यात आलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, April 7, 2014, 19:54