`चीनी हॅकर्सच्या हाती संवेदनशील माहिती नाही`, drdo on china cyber attack

`चीनी हॅकर्सच्या हाती संवेदनशील माहिती नाही`

`चीनी हॅकर्सच्या हाती संवेदनशील माहिती नाही`
www.24taas.com, नवी दिल्ली

चीनी हॅकर्सच्या हाती कोणतीही संवेदनशील माहिती लागल्याच्या वृत्ताचं ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्था’च्या (डीआरडीओ) अधिकाऱ्यांनी खंडन केलंय. या सायबर हल्ल्यात चीनच्या हॅकर्सच्या हातात कोणत्याही प्रकारची माहिती हाती लागली नसल्याचा खुलासा डीआरडीओचे प्रवक्ते रवि गुप्ता यांनी केलाय. डीआरडीओचे सर्व कम्प्युटर्स सुरक्षित असून कोणतीही माहिती लिक झाली नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

चीनी हॅकर्सनं ‘डीआरडीओ’चे शेकडो कम्प्युटर हॅक करुन संवेदनशील माहिती चोरण्यात आल्याचं वृत्त डीएनए या वृत्तपत्रानं जाहीर केलं होतं. चीनच्या काही हॅकर्सनी ‘डीआरडीओ’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ई-मेल आयडी हॅक केले. त्यानंतर त्यांनी संवेदनशील माहितीची चोरली. या ईलमेलवर जी माहिती येत होती ती काही सेकंदातच चीनी सर्व्हरपर्यंतही पोहचत होती. चोरलेल्या सर्व फाईल्स चीनच्या गुआंगडोन प्रांतातल्या सर्व्हरवर अपलोड करण्यात आल्यात. हा सायबर हल्ला मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आला.

ही माहिती मिळाल्यानंतर डीआरडोओनं तातडीनं पावलं उचललीत. सरकारच्या ‘नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन’नं (NTRO) प्रायव्हेट सायबर सिक्युरिटी एक्सपर्टसोबत या सायबर हल्ल्याचा तपास लावलाय. चौकशी दरम्यान, या हॅकर्सनं अमेरिका, रशिया आणि दक्षिण कोरिया या देशांचीही महत्त्वाच्या माहितींवर डल्ला मारलाय.

First Published: Wednesday, March 13, 2013, 13:37


comments powered by Disqus