Last Updated: Thursday, January 23, 2014, 14:55
www.24taas.com, वृत्तसंस्था, चीनकपड्यांमध्ये आलेल्या स्टॅटिक विद्युतमुळं एका घरात चक्क गॅसचा स्फोट झाला. या स्फोटामुळं घरात आग लागली आणि ७० वर्षीय चुंग हे पूर्णपणे भाजले गेले.
चुंग यांचा चेहरा, मान आणि हात भाजला गेलाय आणि उत्तर चीनच्या जियांग्सु पिपल्स हॉस्पिटलमध्ये सुरू आहे.
चुंग यांच्या पुतण्यानं दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट खूप मोठा होता. ३०० मीटरपर्यंत याचा आवाज ऐकायला गेला.
स्फोटामुळं तीन दरवाजे आणि घरातले सर्व काच तुटून पडले. सुरुवातीच्या तपासात पाईपलाईन जुनी असल्यानं गॅस लिक झाल्याचं समोर आलं आणि स्टॅटिक विद्युतमुळं गॅसला आग लागल्याचंही पुढं आलं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, January 23, 2014, 14:54