भूकंपाचे केंद्रबिंदू इराणमध्ये, १०० जण ठार झाल्याची भीती, Earthquake measuring 7.8 points occurs in Iran

भूकंपाचे केंद्रबिंदू इराणमध्ये, १०० जण ठार झाल्याची भीती

भूकंपाचे केंद्रबिंदू इराणमध्ये, १०० जण ठार झाल्याची भीती
www.24taas.com, खाश, इराण

देशाची राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात आज च ४.२० मि. भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.३ ऐवढी नोंदली गेली. चंदीगढ, जयपूर आणि गुजरात मध्ये देखील या भूकंपाचे झटके जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू पाकिस्तान-इराण बॉर्डरपासून खास या भागात असल्याचे समजते.

इराणमध्ये या भूकंपाची तीव्रता ७.८ इतकी तीव्र होती. या भूकंपामुळे इराणमधील १०० लोक मृत्यूमुखी पडले असल्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. पाकिस्तान-इराण बॉर्डर पासून खाश हे ठिकाण फक्त १५ किमी. अतंरावर आहे.

भूकंपापासून होणार नुकसानापासून वाचण्यासाठी लोक ऑफिस आणि घरातून त्वरीत बाहेर पडले. भूकंपात मृतांची संख्या वाढण्याची शक्याताही वर्तविण्यात येते आहे. भूकंपाचे झटके भारतातही बसल्याने काही काळ भारतातील काही भागात भीतीचे वातावरण होते.


First Published: Tuesday, April 16, 2013, 17:28


comments powered by Disqus