XCLUSIVE व्हिडिओ : इराकमध्ये फसलेले भारतीय, First exclusive videos and pictures of kidnapped Indians

EXCLUSIVE व्हिडिओ : इराकमध्ये फसलेले भारतीय

<B> <font color=red> EXCLUSIVE व्हिडिओ :</font></b> इराकमध्ये फसलेले भारतीय

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

इराकमध्ये सुरु असलेल्या यादवी युद्धात अनेक जण भरडले जात आहेत. इराकच्या बसरा शहरात नोकरीच्या शोधात गेलेल्या काही भारतीयांचाही यामध्ये समावेश आहे... याच काही इथं फसलेल्या भारतीयांचा पहिला व्हिडिओ `झी मीडिया`च्या हाती लागलाय.

बसरामध्ये जवळपास 700 ते 800 भारतीय फसलेले असल्याचं समजतंय. इथून बाहेर पडण्याचा मार्ग न मिळाल्यानं त्यांना इथंच कठिण परिस्थितीत जीवन कंठावं लागतंय.

इथं फसलेल्यांपैकी ज्योतीकुमार या तरुणानं मोबाईलच्या साहाय्यानं एक व्हिडिओ काढलाय आणि तो त्यानं झी मीडियापर्यंत पोहचवलाय. यात या तरुणांनी आपली व्यथा मांडलीय.


पाहा, हे तरुण इराकमध्ये कोणत्या परिस्थितीत जगत आहेत...




* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, June 21, 2014, 12:06


comments powered by Disqus