गांधींच्या चरख्याचा लंडनमध्ये कोट्यावधी रुपयांमध्ये लिलाव, Gandhi`s charkha sold for £1,10000 at London auction

गांधींच्या चरख्याचा लंडनमध्ये कोट्यवधी रुपयांमध्ये लिलाव

गांधींच्या चरख्याचा लंडनमध्ये कोट्यवधी रुपयांमध्ये लिलाव
www.24taas.com, झी मीडिया, लंडन

१९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या वेळी येरवडा तुरुंगात असताना महात्मा गांधीजींनी वापरलेल्या चरख्याची लंडनमध्ये झालेल्या एका लिलावात विक्री करण्यात आली आहे. हा चरखा एक लाख दहा हजार पौडांना म्हणजेच एक कोटी आठ लाख रुपये इतक्या किमतीत विकला गेला आहे.

महात्मा गांधी यांनी हा चरखा अमेरिकी मिशनरी रेव्हरंड फ्लॉईड ए. पफर यांना भेट दिला होता. ऐतिहासिक कागदपत्रे आणि वस्तू यांच्या मुलॉक ऑक्शकन हाउस या संस्थेने घेतलेल्या या लिलावात या चरख्याला ६० हजार पौंड ही किंमत मिळण्याची शक्यता होती. मात्र जवळपास दुप्पट किमतीत हा चरखा विकला गेला.

या लिलावात गांधीजींनी १९२१ साली लिहिलेल्या शेवटच्या इच्छापत्रालाही वीस हजार पौंड किंमत मिळाली. गुजराती भाषेतील हे इच्छापत्र त्यांनी साबरमती आश्रमात लिहिले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, November 6, 2013, 13:02


comments powered by Disqus