नेपाळमधील बस अपघातात १४ ठार, In Nepal, the bus fell into the river, killing 14 people and injuring.

नेपाळमधील बस अपघातात १४ ठार

नेपाळमधील बस अपघातात १४ ठार
www.24taas.com, वृत्तसंस्था,काठमांडू

पल्पा जिल्ह्यातील पर्वत भागात आज गुरुवारी सकाळी भालूकोला नदीमध्ये बस नदीत कोसळल्याने झालेल्या अपघातात १४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात सात जण जखमी झाले आहेत.

सिद्धार्थ महामार्गावरील पर्वत भागात बसला रात्री दोनच्या सुमारास अपघात झाला. बस ५०० मीटर खोल भागात नदीत कोसळली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. या बसमध्ये २१ प्रवासी होते, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.

या अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामध्ये बसचा चालक आणि मालकाचाही मृत्यू झाला. दरम्यान, घटनास्थळी पोलीस आणि बचाव दलाचे जवान मदतकार्य करीत आहेत. मृतांची ओळख अजूनही पटलेली नाही.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, February 6, 2014, 16:29


comments powered by Disqus