Last Updated: Wednesday, March 19, 2014, 15:59
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई शीख विद्यार्थ्यांनी सांगितलं की कशाप्रकारे त्यांच्या मित्राच्या पगडीचं हसू केलं जातं आणि जबरदस्ती ती काढण्याचा प्रयत्न केला जातो. हा धक्कादायक प्रकार आहे यूएसमधला. शीख विद्यार्थ्यांना ओसामा बिन लादेन किंवा दहशतवादी म्हणत आपल्या देशात परत जा, अशाप्रकारचा त्रास दिला जातोय.
५०० पेक्षा जास्त शीख विद्यार्थ्यांवर केल्या गेलेल्या सर्वेक्षणाद्वारे हे पुढं आलंय. यूएसमधील मेसाच्युएट्स, इंडियाना, वॉशिंग्टन आणि कॅलिफोर्निया या चार राज्यांमधील ५० शीख विद्यार्थ्यांनी याबाबतची माहिती दिली.
गेल्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये हे नमूद करण्यात आलंय की मोठ्या संख्येनं शीख विद्यार्थ्यांना शाळांमध्ये धमक्यांना सामोरं जावं लागतं. विशेष म्हणजे पगडी घातलेल्या शीख मुलांना तर जास्तच त्रास दिला जातो. ९/११च्या हल्ल्यानंतर अमेरिकेतील शीख आणि त्यांच्या मुलांची स्थिती खूप हलाखिची असल्याचं रिपोर्टमध्ये मांडण्यात आलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, March 19, 2014, 15:51