Last Updated: Sunday, September 9, 2012, 00:01
www.24taas.com, इस्लामाबादभारत आणि पाक या दोन देशांच्या नव्या संबंधांना सुरुवात झालीय.. दोन्ही देशांसाठी व्हिसा नियमांना शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.. याबाबतच्या करारावर दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्यात..
इस्लामाबादमध्ये भारताचे परराष्ट्रमंत्री एस.एम.कृष्णा आणि पाकच्या परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांच्यात चर्चा झाली. यावेळी दोघांमध्ये दहशतवाद, २६/११ सह विविध महत्वांच्या मुद्यावर चर्चा झाली.
वीजा नियमांमध्ये शिथिलता आणल्यामुळं नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचं हिना रब्बानी खार यांनी म्हटलंय. तसंच पाकमधील सर्व भारतीय मच्छिमारांना सोडणार असल्याची घोषणाही त्यांनी केली..
First Published: Saturday, September 8, 2012, 23:58