`चर्चेसाठी पाकनं आधी चूक कबूल करावी`

Last Updated: Thursday, January 17, 2013, 15:00

‘पाकिस्ताननं पहिल्यांदा आपली चूक कबूल करावी आणि भारतीय सैनिकांची क्रूर पद्धतीनं हत्या करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी’, असं केंद्रीय मंत्री मनिष तिवारी यांनी म्हटलंय.

भारत पराभवाचा बदला घेणार ?

Last Updated: Thursday, December 27, 2012, 18:27

भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटच्या रणांगणावर टी-20ची लढत रंगणार आहे. टीम इंडिया पराभवाचा बदला घेण्यासाठी आतूर असेल तर दुसरीकडे पहिल्या टी-20त विजय मिळवल्याने पाकिस्तान टीमचा आत्मविश्वास उंचावलेला असेल. आता या निर्णायक लढतीत कोण बाजी मारत हे पाहणं रंगतदार ठरणार आहे.

चुरशीच्या सामन्यात पाक विजयी

Last Updated: Tuesday, December 25, 2012, 22:55

मोहम्मद हाफिज आणि शोएब मलिक यांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे पाकिस्तानने भारतावर पहिल्या सामन्यात विजय मिळवला. विजयासाठी 3 चेंडुंमध्ये 6 धावांची गरज असताना मलिकने रविंद्र जडेजाला षटकार ठोकून विजयावर शिक्कामोर्तब केले.

भारत-पाक सामन्यांना तालिबानची धमकी

Last Updated: Sunday, December 23, 2012, 20:43

अनेक जणांचा विरोध डावलून शनिवारी पाकिस्तान संघाचं भारतात आगमन झालं. शिवसेनेने भारत-पाक सामन्यांना यापूर्वीच विरोध दर्शवला आहे. आता तालिबाननेही भारत- पाक सामन्यांचा निषेध करत हे सामने झाल्यास हिंसक कारवाई करण्याची धमकीही दिली आहे.

पाकमध्ये अणु क्षेपणास्त्रांची निर्मिती जोरात

Last Updated: Thursday, August 9, 2012, 14:06

भारताला लक्ष्य करून पाकिस्तान आपल्या अणु क्षेपणास्त्रांमध्ये सातत्यानं बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहे. अशी माहिती खळबळजनक माहिती अमेरिकन काँग्रेसनं आपल्या एका रिपोर्टमध्ये दिलीय.

पाकला भारतात थेट गुंतवणुकीची परवानगी

Last Updated: Thursday, August 2, 2012, 08:34

भारत सरकारने पाकिस्तानाला भारतीय व्यापारात गुंतवणूक करण्याची मुभा दिली आहे. भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध सुधारावेत आणि पाकिस्तानाकडून भारताला सर्वांत प्रिय राष्ट्र (MFN) दर्जा मिळावा, या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.

भारत-पाक वन डे मालिकेला मंजूरी

Last Updated: Monday, July 16, 2012, 17:32

भारत आणि पाकि‍स्‍तानात दोन्‍ही देशांमध्‍ये गेल्या बऱ्याच काळापासून बंद असलेल्या क्रिकेट मालिकेला मंजूरी मिळाली आहे. पाकिस्‍तानी क्रिकेट संघ येत्‍या डिसेंबरमध्‍ये भारताच्‍या दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेत तीन एक दिवसीय सामने होणार आहेत.

भारत-पाक सामन्यांना महाराष्ट्र काँग्रेसचा विरोध

Last Updated: Monday, July 16, 2012, 16:27

पाच वर्षानंतर होत असलेल्या भारत पाक क्रिकेट सीरिजला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं विरोध केलाय. पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामने खेळवण्याबाबत बीसीसीआयनं फेरविचार करावा अशी मागणी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी केली आहे.

भारत-पाक क्रिकेट सिरीज सुरू व्हावी - झरदारी

Last Updated: Monday, April 9, 2012, 12:25

झरदारी यांच्या बरोबरच्या चर्चेत भारताने दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. मुंबई हल्ल्यातल्या दोषींवर कारवाई करण्याचा मुद्दा भारताकडून उपस्थित करण्यात आला. द्विपक्षीय व्यापार वाढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याबाबतही चर्चा झाली. भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सिरीज सुरु करण्याची मागणी झरदारींनी पंतप्रधानांकडे केल्याचं सुत्रांनी सांगितलं.