Last Updated: Tuesday, April 30, 2013, 17:30
www.24taas.com, झी मीडिया, डरबन दक्षिण अफ्रीकेत एका मुलीवरून झालेल्या वादात भारतीय वंशाच्या १६ वर्षीय शालेय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेत त्याचा भाऊही जबर जखमी झाला आहे.
भारतीय वस्ती असलेल्या चैट्सवर्थ भागातील एका गल्लीत सामूहिक हल्ल्यात दर्शन मोडले या १६ वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली आहे. तर त्याचा १८ वर्षीय भाऊ रेवरशीन याला जबर जखमी करण्यात आलं आहे. हल्लाकर्त्यांनी त्या दोघांना मारहाण केल्यानंतर चाकूने हल्ला केला. ते दोघे मृत आढल्यामुळे तिथेच टाकून देण्यात आले.
जखमी रेवशीनला लगेच हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले. दर्शनवर याआधी असा हल्ला झाला होता. याआधी त्याच्या शालेय सहकाऱ्याने चाकूने वार केला होता. एका मुलाने दर्शनला आपल्या बहिणीसोबत पाहिले होते तेव्हा या वादाला तोंड फुटले असेल अशी दर्शनच्या वडीलांनी माहिती दिली.
First Published: Tuesday, April 30, 2013, 17:30