दक्षिण अफ्रीकेत भारतीय विद्यार्थ्याची हत्या

Last Updated: Tuesday, April 30, 2013, 17:30

दक्षिण अफ्रीकेत एका मुलीवरून झालेल्या वादात भारतीय वंशाच्या १६ वर्षीय शालेय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेत त्याचा भाऊही जबर जखमी झाला आहे.

विद्यार्थिनीचा विनयभंग : उपप्राचार्याला अटक

Last Updated: Tuesday, January 22, 2013, 19:53

पुण्यातील डॉन बॉस्कोच्या उपप्राचार्य म्हणजेच फादरला विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. इज्यू फलकावू असं या फादरचं नाव आहे.

पाच विद्यार्थ्यांनी केला विद्यार्थीनीवर बलात्कार

Last Updated: Thursday, July 26, 2012, 13:18

ती आणि तो. एकाच वर्गात शिकत होते. क्लासला जाताना दोघेही एकत्र जायचे. त्यांच्यात कालांतराने मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पण याच मैत्रीने तिचा घात केला. अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गातील पाच मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना बिहार राज्यात घडली आहे.

बारामतीत विद्यार्थिनीचे उतरविले शाळेत कपडे

Last Updated: Tuesday, July 17, 2012, 17:39

अतिशय धक्कादायक बातमी पुण्यातल्या बारामतीमधून. विद्यार्थ्यांना दिल्या जात असलेल्या शिक्षांवरुन वातावरण तापलेलं असतानाच, बारामतीमध्येही असाच धक्कादायक प्रकार घडलाय. तिसरीतल्या एका विद्यार्थिनीनं शाळा बुडवली म्हणून तिला कपडे उतरावयाला लावण्याची अघोरी शिक्षा देण्यात आली.

खासगी शाळांपुढं सरकार झुकले

Last Updated: Thursday, May 17, 2012, 08:56

गरीब विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्याच्या निर्णय केंद्र सरकारनं घेतल्यानंतर राज्य मंत्रिमंडळानंही या निर्णयाला मंजूर दिलीय. परंतु खासगी शाळांचा या निर्णयाला असलेला विरोध लक्षात घेऊन प्रत्येक विद्यार्थ्यामागे १० हजार २१७ रुपये खासगी शाळांना देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळं खासगी शाळांपुढं राज्य सरकार झुकल्याचं चित्र दिसत आहे.

सहावीतल्या विद्यार्थ्यांनी बनवला 'पॉर्न व्हिडिओ'

Last Updated: Thursday, May 10, 2012, 22:32

मेक्सिकोमधील कांपेशे प्रांतातील सहावीतल्या विद्यार्थ्यांनी शाळेमध्येच पॉर्न व्हिडियो तयार केला आहे. आता अधिकारी या संपूर्ण घटनेची तपासणी करण्याच्या कामात गुंतले आहेत. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनीही ही घटना घडल्याचं मान्य केलं आहे.

विद्यार्थ्यांना स्वच्छतागृह सफाईची शिक्षा

Last Updated: Tuesday, January 10, 2012, 18:17

ओरिसा येथील केंद्रपारा जिल्ह्यातील सरकारी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना जबरदस्तीने स्वच्छतागृहांची सफाई करण्यास भाग पाडले. पट्टमुंडाई पोलिस चौकीच्या हद्दीत हा विभाग येतो.

विद्यार्थ्याला गमवावा लागला पाय

Last Updated: Saturday, December 3, 2011, 11:07

डोंबिवलीतल्या एस के बोस शाळेतल्या विद्यार्थ्याला पाय गमवावा लागला. या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच डोंबिवलीतल्या आणखी एका विद्यार्थ्याचा पाय मोडलाय. यावेळीही शाळेनं विद्यार्थ्यालाच दोषी ठरवलंय.

बसमधून डोकावताना शाळकरी मुलाचा मृत्यू

Last Updated: Thursday, November 24, 2011, 15:37

मुंबईत बसमधून बाहेर डोकावताना एका शाळकरी मुलाच्या मृत्यू झाला. आणि यांचे हिंसक पडसाद उमटले आहेत. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी सायनच्या वल्लभ शिक्षण संगीत आश्रम शाळेत तोडफोड केली. बसमध्ये विद्यार्थ्यांसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचा आरोप युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केला.