भारताची ‘सृष्टी’ यंदाची ‘मिस एशिया पॅसिफिक वर्ल्ड’!India’s Srishti crowned Miss Asia Pacific World13

भारताची ‘सृष्टी’ यंदाची ‘मिस एशिया पॅसिफिक वर्ल्ड’!

भारताची ‘सृष्टी’ यंदाची ‘मिस एशिया पॅसिफिक वर्ल्ड’!
www.24taas.com, वृत्तसंस्था, बुसान

कोरिया इथं पार पडलेल्या “मिस एशिया पॅसिफिक वर्ल्ड २०१३” हा किताब पटकावला भारताच्या सृष्टी राणानं... या स्पर्धेत ४९ स्पर्धेक होते. या ४९ स्पर्धकांमधून सृष्टीची निवड करण्यात आली. सौंदर्य आणि बुद्धीमत्तेच्या जोरावर तिची निवड करण्यात आली आहे.

हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे, असं यावेळी बोलतांना सृष्टी म्हणाली. मिस एशिया पॅसिफिक वर्ल्ड २०१३ सोबतच ‘बेस्ट नॅशनल कॉस्ट्युम’चा पुरस्कारही सृष्टीनं पटकावला.

२१ वर्षीय सृष्टी राणा हा किताब पटकावणारी चौथी भारतीय ठरली आहे. या आधी अभिनेत्री झिनत अमान, दिया मिर्झा आणि हिमांगिनी सिंग यदू यांनी ही स्पर्धा जिंकली होती.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, October 31, 2013, 10:59


comments powered by Disqus