बगदादच्या कॅफेमध्ये आत्मघातकी स्फोट, ३७ जण ठारIraq violence: 37 dead in suicide bombing at Baghdad

बगदादच्या कॅफेमध्ये आत्मघातकी स्फोट, ३७ जण ठार

बगदादच्या कॅफेमध्ये आत्मघातकी स्फोट, ३७ जण ठार
www.24taas.com, वृत्तसंस्था, बगदाद

इराकची राजधानी बगदाद इथं काल रात्री आत्मघातकी स्फोट झाला. स्फोटकांनी भरलेली कार उडवून देण्यात आली. या स्फोटात ३७ जण ठार झाले आहेत. तर देशातल्या इतर ठिकाणी घडलेल्या हिंसक घटनांमध्ये १० जणांचा मृत्यू झालाय.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा कॅफेसमोर हा स्फोट झाला तेव्हा कॅफेत अनेक ग्राहक उपस्थित होते. बगदादमधील हा कॅफे आणि जवळच असलेलं ज्यूसचं दुकान तरुणांचं विशेष आकर्षणाचं केंद्र आहे. या स्फोटात ३७ जण ठाप तर ४५ जणं जखमी झाल्याचं तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, October 21, 2013, 10:21


comments powered by Disqus