Last Updated: Tuesday, January 21, 2014, 10:53
www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क जेव्हा तुम्ही पहाटे पहाटे झोपेतून जागं होऊन गरमागरम चहाचे घुटके मारत असता तेव्हा दूर अंतराळात कुठेतरी नव्या ताऱ्यांची उत्पत्ती होत असते, हे तुम्हाला ठाऊक आहे का? धूळकण आणि गॅसमुळे निर्माण झालेल्या चक्रामुळे नव्या ग्रहांच्या रचनेचा नुकताच खुलासा झालाय.
जपानच्या शोधकर्त्यांच्या एका टीमच्या मते, धूळकण आणि गॅसचं एक चक्र `एचडी १४२५२७` नावाच्या एका ताऱ्याच्या चारही बाजुंना तयार झालंय. हा तारा ४५६ प्रकाशवर्ष दूर `लूपस` नावाच्या दक्षिणी नक्षत्रात स्थिर आहे.
जपानच्या ओसाका विश्वविद्यालयाचे सहाय्यक प्रोफेसर मिसातो फुकागावा यांच्या म्हणण्यानुसार, `उत्तरी क्षेत्रातील चमक-धमक बघून आम्ही खूपच आश्चर्यात पडलो. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीही एवढी चमकदार गाठ पाहिली नव्हती`.
त्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकाशावरून लगचेच अंदाज बांधता येतो की या गाठिच्या उत्तरी क्षेत्रात सघन क्लटरिंग आहे. विशिष्ट मर्यादेपर्यंत इथं चमकदार सामग्री जमा होईल तेव्हा नव्या चमकदार ग्रह किंवा ताऱ्याची निर्मिती होईल.
फुकागावा यांच्या टीमच्या् मते, एखाद्या कठोर ग्रह किंवा बृहस्पतीच्या आकाराच्या मोठा ग्रहांची निर्मिती `एचडी१४२५२७` या ताऱ्याच्या आसपास होतेय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, January 21, 2014, 10:53