अपहरण करून चार महिलांनी केला सैनिकावर बलात्कार, Male Soldier Gang Raped By 4 Women

अपहरण करून चार महिलांनी केला सैनिकावर बलात्कार

अपहरण करून चार महिलांनी केला सैनिकावर बलात्कार

www.24taas.com, झी मीडिया, हरारे

बलात्कार हा बलात्कार असतो.... त्याला कोणत्याही प्रकारात माफ करता कामा नये.... जगभरात आपल्याला महिलांवर बलात्कार झाल्याचा घटना घडलेल्या दिसतात. पण इथे एका पुरूषाचे तेही सैनिकाचे अपहरण करून चार महिलांनी त्यावर सुमारे आठवडाभर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

झिम्बाब्वेमध्ये उलट प्रकार घडला आहे. चार महिलांनी चक्क एका पुरुष सैनिकाचे अपहरण करुन त्याच्यावर सामुहिक बलात्कार केला. जवळपास आठवडाभर तो या महिलांच्या कचाट्यात होता. या महिलांनी त्या‍ला दगडही मारले. अखेर त्याला एका डोंगरावर फेकून फरार झाल्या.

25 वर्षांच्या या सैनिकाचे मुटारे शहरात अपहरण झाले. महिलांना त्याने लिफट मागितली. या गाडीत 2 महिला आणि 1 पुरुष आधीपासून बसले होते. काही अंतर पार केल्यानंतर चालकाने गाडी दुसऱ्या मार्गावर वळवली. संशय आल्यामुळे सैनिकाने जाब विचारला. तेव्हा कारमध्ये बसलेल्या इतर लोकांनी चाकूचा धाक दाखवून गप्प केले. त्यानंतर त्याच्या डोळ्यावर एका महिलेने काळी पट्टी बांधली.

या सैनिकाला एका बंगल्यावर नेण्यात आले. तिथे त्याला विवस्त्र करण्यात आले. त्या्नंतर त्याला टोळीतल्या् महिलांसोबत शारीरिक संबंध करण्यास बळजबरी केली. हा प्रकार जवळपास आठवडाभर सुरु होता. 23 एप्रिलला त्याला पुन्हा डोळ्यावर काळी पट्टी बांधून डंगमवुरा येथील डोंगरावर फेकून दिले. त्याच्याजवळचे 35 डॉलर्सही या महिलांनी काढून घेतले. त्याच्या डाव्या पायावर दगडाने मारल्याच्या जखमा होत्या्. याप्रकरणी त्याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तपास सुरु करण्यात आला आहे.

First Published: Tuesday, April 30, 2013, 20:00


comments powered by Disqus