भेटा जगातील सर्वात खराब ड्रायव्हरला, manila worst driver in the world caught on cctv

भेटा जगातील सर्वात खराब ड्रायव्हरला

भेटा जगातील सर्वात खराब ड्रायव्हरला

www.24taas.com, झी मीडिया, मनीला
या महाशयांना भेटा हे जगातील सर्वात खराब ड्रायव्हर आहेत. फिलिपिन्सची राजधानी मनीला येथील एक व्यक्ती आपली स्कूटर घेऊन रस्त्यावर उतरला तेव्हा त्याने रस्त्यात गोंधळ माजवला.


रस्त्यावर या व्यक्तीने स्कूटर एक नाही दोन नाही तब्बल तीन गाड्यांना ठोकली. त्याची अशी ड्रायव्हिंग पाहून रस्त्यावरील इतर चालक हैराण झाले होते. एक डिव्हाडर, एक कार, एक स्कूटरला ठोकून त्याने स्कूटर एका बसला ठोकली.

बस चालक माणुसकीच्या नात्याने खाली उतरला. त्या व्यक्तीला स्कूटर आणि हेल्मेट उचलून दिले. पण त्या माणसाने हद्द ओलांडली आणि सरळ एका खड्ड्यात जाऊन पडला.

पाहा हा मजेदार व्हिडिओ



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 9, 2014, 16:57


comments powered by Disqus