`हृदय`खाली पडूनही प्रत्यारोपण यशस्वी होतं तेव्हा... Mexican Medics Drop Human Heart on The Street

व्हिडिओ: हृदयासाठी काळजाचा ठोका चुकवणारा 'तो' क्षण

<b><font color=red> व्हिडिओ: </font></b> हृदयासाठी काळजाचा ठोका चुकवणारा 'तो' क्षण
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

हृदय वेळेवर प्रत्यारोपणासाठी पोहोचवण्याच्या घाईत काहीही होऊ शकतं, या आधी मेक्सिकोत हृदय प्रत्यारोपणासाठी नेत असतांना हृदयाचा ठोका चुकवणारी घटना घडली. ही घटना जानेवारी 2012 ची आहे.

मेक्सिकोत एका एअर अॅम्ब्युलन्सने हे हृदय एका बॉक्समध्ये हॉस्पिटलपर्यंत नेण्यासाठी पिवळ्या पिशवीत सुरक्षित ठेवण्यात आलं, बाजूला तापमान नियंत्रणासाठी बर्फही ठेवण्यात आला होता.

या दरम्यान हॉस्पिटलपर्यंतचे रस्तेही बंद करण्यात आले होते. मात्र एअर अॅम्ब्युलन्समधून जेव्हा हे हृदय उतरवण्यात आलं.

तेव्हा एकाचा पाय लागून हा बॉक्स उघडला आणि हे ह्दय रस्त्यावर पडलं, पण परिस्थितीचं भान ठेऊन, क्षणाचाही विलंब न करता हे पिवळ्या बॅगेतील हृदय पुन्हा त्या बॉक्समध्ये टाकण्यात आलं.

आनंदाची गोष्ट म्हणजे हे हृदय प्रत्योरोपण यशस्वी झालं. चेन्नईत नुकतचं एका 21 वर्षीय युवतीवर हृदय प्रत्यारोपण करण्यात आलं.

म्हणजेच मॅक्सिकोत जी चूक झाली, ती चेन्नईत झाली नाही. यावरून चेन्नईच्या हॉस्पिटलने केवढी काळजी घेतली असेल, ते लक्षात येत.

पाहा मेक्सिकोत झालेली चूक - हा व्हिडीओ जानेवारी 2012 चा आहे



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 18, 2014, 21:14


comments powered by Disqus