Last Updated: Thursday, December 20, 2012, 10:39
www.24taas.com, लास वेगासमिस यूएसए (अमेरिका) असलेली ऑलिविया कुल्पो हिची `मिस युनिव्हर्स-२०१२` म्हणून निवड झाली आहे. दरम्यान, भारताची मिस शिल्पा सिंह पहिल्या दहात आली नसल्याने तिला या स्पर्धेतून बाद व्हावे लागले.
फिलिपाइनची जेनी टगोनन हिच्यावर तिने मात केली. जेनीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तिसऱ्या स्थानावर व्हेनेझुएलाची इरेन ईसर राहिली.
भारतची शिल्पा सिंहही पहिल्या सोळामध्ये होती. अंतिम फेरीत ती या स्पर्धैतून बाहेर पडली. मिस यूएसए (अमेरिका) असलेली ऑलिविया कुल्पो हिच्या डोक्यावर आयोजित केलेल्या भव्य कार्य़क्रमात `मिस युनिव्हर्स-२०१२`चा किताब २०११ची विजेती लीला लोपेज हिने चढवला. जगातून ८९ सुंदरीने या स्पर्धेत भाग घेतला होता.
अमेरिकेती प्रसिद्ध गायक लो ग्रीन, व्हेनेझुएलचा बेस बॉस चॅम्पियन पाबलो सॅंडोवाल तर जपानचा प्रसिद्ध कुक माशाहारू मोरीमोतो आणि अमेरिकेची बिच हॉलीबॉल चॅम्पियन केरी वॉल्स जेनिंग्स यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.
First Published: Thursday, December 20, 2012, 10:39