मोनिका ल्युईन्स्की पुस्तक काढून घेणार बदला , Monica Lewinsky book deal

मोनिका ल्युईन्स्की पुस्तक काढून घेणार बदला

मोनिका ल्युईन्स्की पुस्तक काढून घेणार बदला
www.24taas.com, न्यूयॉर्क
एकेकाळी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन आणि मोनिका लुईन्स्की यांचे प्रेमसंबंध गाजले होते. आता हीच मोनिका एक पुस्तक लिहिणार आहे. यामध्ये तिच्या आणि क्लिंटन यांच्या प्रेमसंबंधांवर ती प्रकाश टाकणार आहे.

व्हाईट हाऊसमधील कर्मचारी असलेल्या मोनिका हिच्याशी असलेले संबंध उघड झाल्यानंतर १९९९८ बिल क्लिंटन यांनी मात्र यापासून चार हात दूर राहणंच पसंत केलं होतं. मोनिकानं मात्र खुलेपणाने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. या प्रकरणामुळे क्लिंटन यांना महाभियोगाच्या कारवाईसही सामोरं जावं लागलं होतं. या प्रकरणातून माघार घेतल्यानं ते वाचले पण, त्यांनी स्वीकारलेली ही सपशेल माघार मोनिकाच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचं म्हटलं जातंय. यासाठीच ती हे पुस्तक लिहून आपले क्लिंटन यांच्याशी तेव्हा असलेले प्रेमसंबंध जगासमोर उघड करणार आहे. यासाठी ती क्लिंटन यांनी पाठवलेली प्रेमपत्रंही प्रकाशित करण्याचा निर्णय मोनिकानं घेतलाय. लुईन्स्कीचा संताप होत असून सूड घेण्यासाठी प्रेमपत्र प्रकाशित करण्याचा निर्णय घेतल्याचे ‘न्यूयॉर्क पोस्ट’ने म्हटले आहे. आपले खळबळजक आत्मचरित्र प्रकाशित करण्यासाठी लुईन्स्कीने सुमारे ६५ कोटी २० लाख रुपये (१२ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स) घेतले असल्याचं माहिती मिळतेय. यापूर्वीच्या एकाही मुलाखतीत मोनिकानं क्लिंटन यांच्यासोबतच्या संबंधांबाबत खुलेपणाने काहीही सांगितलेलं नव्हतं.

First Published: Saturday, September 22, 2012, 18:58


comments powered by Disqus