दिलीपकुमार यांच्या `सबस्टन्स अँड द शॅडो`चे प्रकाशन

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 08:46

दिलीप कुमार म्हणजे चित्रपटसृष्टीतील जिवंत दंतकथाच. आपल्या अदाकारीने कित्येक वर्षे रूपेरी पडदा गाजवणारे, दिग्गज सिने अभिनेते दिलीप कुमार यांच्या अधिकृत आत्मचरित्राचं प्रकाशन झालं.

मराठीत पहिल्यांदाच `ब्लॉग पुस्तक स्वरूपात`

Last Updated: Monday, May 12, 2014, 23:18

ब्लॉगसारखे नवे माध्यम, ब्लॉगवरील लिखाण पुस्तकरूपाने आणण्याचा नवा प्रयोग, एका तरूण संपादकाने मांडलेले नवे चिंतन आणि नव्या पिढीच्या राजकीय नेत्यांच्या हस्ते प्रकाशन असा नव्याचा संगम `माझं आभाळ` या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने घडून येत आहे.

चौथीच्या पाठ्यपुस्तकात चुकांचे राष्ट्रगीत

Last Updated: Friday, May 9, 2014, 23:05

नव्या अभ्यासक्रमाची पुस्तकं छापायची म्हणजे त्यात चुकाच असल्या पाहिजेत, हे चित्र आपण दरवर्षी कुठल्या ना कुठल्या विषयाच्या पुस्तकाबाबत पाहतो. यंदा मात्र पाठ्यपुस्तक मंडळानं कहर केलाय. चौथीच्या पाठ्य पुस्तकात राष्ट्रगीतात अनेक चुका आहेत.

माओवादी-दहशतवाद्यांची हातमिळवणी जाहीर

Last Updated: Wednesday, April 30, 2014, 15:40

देशातल्या माओवादी संघटना काश्मिर आणि इतर भागातल्या दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याची चर्चा नेहमीच असते. मात्र, आता यात तथ्य आढळलंय.

`सिध्दिविनायक` आता ग्रंथरूपात भक्तांच्या भेटीला

Last Updated: Wednesday, March 26, 2014, 08:44

मुंबईतला प्रसिध्द सिध्दिविनायक गणपती आता ग्रंथरूपानंही भक्तांच्या भेटीला येतोय. `श्री सिध्दिविनायक अनन्य साधारण ऊर्जा` या ग्रंथाचं मंगळवारी मुंबईत प्रकाशन झालं. या वेळी ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं.

‘अनब्रेकेबल’ मेरी कोमचं आत्मचरित्र, बिग बींच्या हस्ते प्रकाशन!

Last Updated: Tuesday, December 10, 2013, 14:37

भारताची ‘क्वीन ऑफ बॉक्सिंग रिंग’ म्हणजेच मेरी कोमची कथा आता पुस्तकरुपात जगासमोर आलीय. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते ‘अनब्रेकेबल’ या मेरीच्या आत्मचरित्राचं प्रकाशन करण्यात आलं.

सचिन तेंडुलकर आता पाठ्यपुस्तकात

Last Updated: Tuesday, November 19, 2013, 11:43

क्रिकेटच्या मैदानातून निवृत्त झालेला सचिन तेंडुलकर आता लवकरच पाठ्यपुस्तकांमध्ये पदार्पण करणार आहे. शालेय अभ्यासक्रमात सचिनच्या धड्याचा समावेश करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी ही माहिती दिली.

सिंधुताई सपकाळ पाठ्यपुस्तकांतून देणार धडा!

Last Updated: Tuesday, May 21, 2013, 11:08

पतीनं टाकून दिल्यानंतरही जीद्दीनं उभ्या रहाणाऱ्या... अनाथांची सेवा करणाऱ्या... सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनकार्याचा समावेश असलेला धडा यंदापासून दहावीच्या अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्यात आलाय.

मनपाच्या मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना हिंदीमध्ये प्रगतीपुस्तकं!

Last Updated: Thursday, May 2, 2013, 17:34

मुंबई महापालिकेच्या एका शाळेत मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना चक्क हिंदी रिपोर्ट कार्ड दिली गेली आहेत.

पहिल्या दौऱ्यात सचिनने नेली अभ्यासाची पुस्तकं

Last Updated: Thursday, April 25, 2013, 21:26

सचिनच्या वाढदिवसानिमित्त भारताचे माजी कॅप्टन कपिल देवने सचिन तेंडुलकरच्या पहिल्या दौ-याच्या आठवणींना उजाळा दिला.

आर आरss आबा; बघा तुमचे पोलीस काय करतायत!

Last Updated: Friday, March 22, 2013, 11:40

रस्ते बांधणी आणि देखभालीच्या मोबदल्यात टोलवसूल केला जातो, हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र, अहमदनगरमध्ये चक्क पोलिसांनीच ‘टोलनाका’ सुरु केलाय.

अल्पसंख्यांक मंत्रालयाचं पुस्तक म्हणतं, गोमांस खा!

Last Updated: Thursday, February 14, 2013, 17:42

शरीरात लोहाचं प्रमाण कमी असेल, तर गोमांस खाण्याचा सल्ला अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या पुस्तकात देण्यात आला आहे. या पुस्तकावर भाजपने आक्षेप घेतला आहे. संसदेतही हा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे.

बाळासाहेबांवरील पुस्तक `युगान्त`आज होणार प्रकाशन

Last Updated: Friday, January 18, 2013, 14:34

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर राऊत यांनी लिहिलेली लेखमाला `युगान्त` या पुस्तकरुपानं प्रकाशित होणार आहे.

`महानामा` तून नामदेवांच्या कार्यावर प्रकाशझोत - कोत्तापल्ले

Last Updated: Monday, January 14, 2013, 12:40

महाराष्ट्रातील प्रबोधनाची सुरुवात संत ज्ञानदेव-नामदेवांनीच सुरू केली. संत नामदेवांनी तर समतेची, मराठीची पताका देशभर नेली. पण दुर्दैवानं नामदेवांकडं महाराष्ट्राचं दुर्लक्ष झालं. `महानामा` या ग्रंथातून नामदेवरायांच्या राष्ट्रव्यापी कार्यावर नवा प्रकाशझोत पडेल, असा विश्वास अखिर भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी इथं व्यक्त केला.

`महाराष्ट्र देशा`... शिवसेनेकडून सत्तेचा गैरवापर?

Last Updated: Thursday, December 13, 2012, 08:26

शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे लिखित ‘महाराष्ट्र देशा’ हे पुस्तक मुंबई महापालिका शाळेत शिकणाऱ्या तीस हजार विद्यार्थ्यांना वाटण्याचा प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.

...जेव्हा सचिन तेंडुलकरला भेटला ओसामा

Last Updated: Monday, December 3, 2012, 17:20

नावात काय आहे असे म्हटले जाते, पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला एका अशा घटनेला सामोरे जावे लागले की त्याला म्हणावे लागले नावातच काही तरी खास आहे.

मोनिका ल्युईन्स्की पुस्तक काढून घेणार बदला

Last Updated: Saturday, September 22, 2012, 18:58

एकेकाळी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन आणि मोनिका लुईन्स्की यांचे प्रेमसंबंध गाजले होते. आता हीच मोनिका एक पुस्तक लिहिणार आहे. यामध्ये तिच्या आणि क्लिंटन यांच्या प्रेमसंबंधांवर ती प्रकाश टाकणार आहे.

व्यंग्यचित्रे पाठ्यपुस्तकांतून होणार हद्दपार

Last Updated: Tuesday, May 15, 2012, 09:20

व्यंग्यचित्रांबाबत संसदेत सर्वच खासदारांनी आवाज उठविल्याने आता जी काही शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकात व्यंग्यचित्र असतील ती वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकार झुकलं, कार्टूनचं पुस्तक मागे घेणार

Last Updated: Monday, May 14, 2012, 13:26

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या वादग्रस्त कार्टूनचं संपूर्ण पुस्तक मागं घेणार अशी घोषणा अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी केली आहे. या पुस्तकावरुन विरोधकांनी लोकसभेत आज पुन्हा गदारोळ घातला.

व्यं.माडगुळकर नव्याने वाचकांच्या भेटीला

Last Updated: Thursday, May 10, 2012, 10:22

मराठी मनावर कित्येक दशक अधिराज्य गाजवणार नाव म्हणजे व्यंकटेश माडगुळकर... मराठी कथेचे परिवर्तकार अशी ओळख असणा-या साहित्य विश्वातल्या या दमदार लेखकाची पुस्तक पुन्हा एकदा मराठी मनाचा ठाव घेण्यासाठी येत आहेत.

स्टीफन हॉकिंग यांना स्त्रीचे गूढ

Last Updated: Saturday, January 7, 2012, 15:46

जगाची ओळख होण्यासाठी आणि हे जग कसे निर्माण झाले, याचा ध्यास प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी घेतला होता. त्यासाठी त्यांनी जगाच्या उत्पत्तीचे गूढ उकलण्यासाठी संशोधन केले. अशा स्टीफन हॉकिंग यांना महिलांचे गुढ वाटत आहे. ते म्हणतात, स्त्री हे एक गुढच आहे.

मुंबई डबेवाल्यांची कार्यपद्धती पुस्तकात

Last Updated: Saturday, January 7, 2012, 09:28

मुंबईचे डबेवाले इथल्या रोजच्या जिवनाचा एक अविभाज्य भाग बनलेत. मॅनेजमेंट गुरू म्हणून डबेवाल्यांना ओळखलं जातं. डबेवाल्याच्या या अविरत सेवेचा एल के शर्मा यांच्या 'द इंडिया आयडीया', 'हेराल्डींग द एरा ऑफ पाथ ब्रेकिंग इनोव्हेशन्स' या पुस्तकात गौरव करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय़ पातळीवर दखल घेण्यात आलेल्या डबेवाल्याच्या कार्यपद्धतीवर या पुस्तकात विशेष प्रकाश टाकण्यात आला आहे.

इमेजसाठी उमेदवार लागलेत वाचायला

Last Updated: Tuesday, December 20, 2011, 12:02

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छूक उमेदवार आता कसून तयारी करत असल्यानं पुस्तकांची विक्री चांगलीच वाढलीय. मतदारांसमोर चांगली इमेज निर्माण व्हावी यासाठी, संभाषण कौशल्य, व्यक्तीमत्व विकास, दिग्गजांची भाषणं या विषयावरील पुस्तकांना नाशकात चांगलीच मागणी वाढलीय.