मुंबईतला इंजिनीअर पाकिस्तानात बेपत्ता, Mumbai base engineer got wanted in pakistan

मुंबईतला इंजिनीअर पाकिस्तानात बेपत्ता

मुंबईतला इंजिनीअर पाकिस्तानात बेपत्ता
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

नोकरीच्या शोधात आफिगाणीस्तानात गेलेला २७ वर्षीय पाकिस्तानात बेपत्ता झाला आहे. पाकिस्तानात त्याचे अपहरण अथवा त्यासोबत काही घातपात घडल्याचा संशय त्याच्या वर्सोवा येथे राहण्याऱ्या कुंटुबियांनी व्यक्त केला आहे.

गेल्या वर्षी ४ नोव्हेंबरला ९० दिवसाच्या पर्यटन परवान्यावर हामिद काबुलला रवाना झाला होता. त्याने एका आठवड्यातचं भारतात परतण्याचे निश्चित केले होते. नोव्हेबंरच्या एका आठवड्यापर्यंत तो आपले वडील नेहाल यांच्या संपर्कात होता. परंतु त्या एका आठवड्यानंतर त्याच्याशी काहीच संपर्क होऊ शकला नाही.
‘आम्हाला एवढचं माहित आहे की, तो पाकिस्तानमध्ये संकटग्रस्त एका मुलीच्या मदतीसाठी प्रयत्न करत होता. पण आम्हाला त्याबाबत काही ठोस पुरावे मिळाले नाहीत.’ असं हामिदचे वडील नेहाल यांनी माहिती दिली

First Published: Monday, April 29, 2013, 12:19


comments powered by Disqus