Last Updated: Friday, September 28, 2012, 11:29
www.24taas.com, काठमांडू नेपाळची राजधानी काठमांडूजवळ विमानाला झालेल्या अपघातामध्ये १९ प्रवासी ठार झालेत. मृतांमध्ये १२ जण परदेशी नागरिक आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
वैमानिकाने विमानाला मनोहरा नदीच्या किनाऱ्यावर सुरक्षितपणे उतरवण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने त्याचवेळी विमानाला आगल लागली. सीता एअरलाईन्सचं हे विमान काठमांडूहून लुकला या शहराकडे निघालं होतं. मात्र विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच त्याला आग लागली, असं काठमांडू पोलिसांचे प्रवक्ते बिनोद सिंह यांनी सांगितलं.
या विमानात १६ प्रवासी आणि तीन क्रू मेंबर्स होते. यामध्ये १२ परदेशी पर्यटक, चार नेपाळी नागरिकांचा समावेश होता.
First Published: Friday, September 28, 2012, 11:29