Last Updated: Monday, November 4, 2013, 13:26
www.24taas.com, वृत्तसंस्था, योला, नायजेरियानायजेरियात लग्नाच्या एका वऱ्हाडावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात नवऱ्या मुलीसह ३० जणांचा मृत्यू झालाय. विवाह झाल्यानंतर हे वऱ्हाड आपल्या घरी निघालं असतांना हा घातपात झाला.
नायजेरियाचे सरकारी प्रवक्ते ले. कर्नल मुहम्मद डोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल हा प्रकार घडला. जेव्हा विवाह समारंभ आटोपल्यानंतर गाडीमधून वऱ्हाडी परतत होते. तेव्हा बोर्नो भागातील गामा-ग्वोझा महामार्गावरून मोटार जात असताना संशयित इस्लामिक दहशतवाद्यांनी दहशतवादी हल्ला घडवून आणला.
तर प्रत्यक्षदर्शी टॅक्सी चालकानं सांगितलं की, वऱ्हाडाची बस जात असतांना अचानक स्फोट झाला. स्फोटानंतर अनेक मृतदेह रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त पडले. टॅक्सीमधील प्रवाशांनी घबराटीमुळं मोटार मागं फिरविण्याची मागणी केली. मात्र, देवाच्या कृपेमुळं आम्ही सुरक्षितरित्या बचावलो. पुढं गेल्यानंतर हल्याबाबतची माहिती पोलिसांना दिली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, November 4, 2013, 13:26