Last Updated: Thursday, March 14, 2013, 16:29
www.24taas.com,इस्लामाबादएका सैनिकाने एका मुलीबरोबर प्रेमसंबंध ठेवले. याची शिक्षा म्हणून सैनिकाला दगडाने ठेचून मारण्यात आले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. ही घटना घडलीय ती पाकिस्तानात.
पाकमधील कुर्राम आदिवासी भागात जिर्रगा या आदिवासी परिषदेने अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध प्रस्तापित केले होते. अल्पवयीन मुलीबरोबर प्रेमसंबंध ठेवल्याप्रकरणी एका सैनिकाला दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा सुनावण्यात आली.
शिक्षा सुनावन्यात आलेल्या सैनिकाला बुधवारी ३०० लोकांनी दगडांचा मारा केला. नुराबुद्दीन असे या सैनिकाचे नाव होते. अनवर याचे एका अल्पवयीन मुलीबरोबर प्रेम होते. या प्रेमाविषयी त्या मुलीच्या घरच्यांना माहिती मिळाली. त्यानंतर अनवर याला जिर्रगा या आदिवासी परिषदेसमोर उभे करण्यात आले. तेथे जमलेल्या ३०० लोकांनी दगडफेक केली. यातच त्याचा मृत्यू झाला.
First Published: Thursday, March 14, 2013, 15:58