महिलेच्या डोक्यात दगड घालून दागिने लंपास

Last Updated: Friday, December 13, 2013, 20:31

शॉर्टकट पद्धतीनं पैसे कमावण्याच्या मागं लागल्यानं दिवसेंदिवस चोरी आणि लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होतेय. अशीच एक घटना हडपसर या ठिकाणी घडली आहे. हडपसर इथल्या टकलेनगर इथं शेतात महिलेच्या डोक्यात दगड घालून तिच्या अंगावरील सहा तोळ्याचे दागिने लपास केले आहे. ही घटना बुधवारी हडपसरमध्ये घडली. या घटनेत जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

विरारामध्ये शनिवारी मध्यरात्री लोकलवर दगडफेकीचा थरार

Last Updated: Tuesday, December 3, 2013, 16:19

विरार स्थानकात शनिवारीमध्यरात्री थरार घटना घडली. विरार स्थानकात १ वाजून ५ मिनिटांनी येणारी लोकल सिग्नल बिघाडामुळे स्थानकाबाहेर ५० मिनिटे उभी राहिली. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी लोकलमधून उतरून दगडफेक केल्याची बाब पुढे आली आहे.

पूरग्रस्तांची मंत्र्यांच्या ताफ्यावर दगडफेक!

Last Updated: Sunday, August 4, 2013, 13:21

पूरग्रस्त भागांचा दौरा करायला गेलेल्या पालकमंत्री संजय देवतळे यांच्या ताफ्यावर संतप्त नागरिकांनी दगडफेक करण्यात आली. चंद्रपूरच्या सिस्टर कॉलनी परिसरात ही घटना घडलीय.

प्रेम केलं म्हणून सैनिकाची दगडाने ठेचून हत्या

Last Updated: Thursday, March 14, 2013, 16:29

एका सैनिकाने एका मुलीबरोबर प्रेमसंबंध ठेवले. याची शिक्षा म्हणून सैनिकाला दगडाने ठेचून मारण्यात आले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. ही घटना घडलीय ती पाकिस्तानात.

शिवाजी महाराज यांचे स्मारक खडकावर

Last Updated: Wednesday, March 13, 2013, 17:03

छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक खडकावर उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. त्यामुळे समुद्रात स्मारक होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

साताऱ्यात पोलिसांवर दगडफेक, तीन एसटी फोडल्या

Last Updated: Tuesday, November 13, 2012, 13:53

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कालच्या आंदोलनाची धग आजही कायम आहे. आज शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साता-यात आंदोलन केलं. पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली तर साता-यातल्या शिवथरजवळ कार्यकर्त्यांनी तीन एसटी फोडल्या. दरम्यान, आंदोलकांच्या मृत्यूंच्या निषेधार्थ इंदापूर बंद पुकारण्यात आलाय.