Last Updated: Wednesday, September 12, 2012, 16:48
www.24taas.com, कराची पाकिस्तानात दोन कारखान्यांना लागलेल्या आगीमध्ये सुमारे १९१ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. कराची आणि लाहोर शहरांमध्ये दोन कारखान्यांमध्ये ही घटना घडली. मृतकांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.
कराचीमध्ये तयार कपडे बनविण्याचा कारखाना आगीत जळून खाक झाला. आग लागली त्यावेळी कारखान्यात ४५० कामगार होते. ४० जणांचे मृतदेह मिळाले असून, ५० जण जखमी आहेत. आग कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नाही.
कपड्यांनी पेट घेतल्यानंतर आग काही क्षणातच भडकली. काही क्षणातच कारखाना भस्मसात झाला. मृतकांमध्ये ३ मुलांचाही समावेश आहे. मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
First Published: Wednesday, September 12, 2012, 16:45