कारगील युद्ध : पाकिस्तानचा आणखी एक बुरखा फाटला Pakistan`s new statement on Kargil war

कारगील युद्ध : पाकिस्तानचा आणखी एक बुरखा फाटला

कारगील युद्ध : पाकिस्तानचा आणखी एक बुरखा फाटला
www.24taas.com, इस्लामाबाद

कारगीलची लढाई भारतीय सैनिकांनी दहशतवाद्यांशी लढून नव्हं तर पाकिस्तानी सैन्यांशी लढून जिंकल्याचं कबूल केलंय पाकिस्तानी सैन्यातील निवृत्त लेफ्टनंट जनरल शाहिद अजीज यांनी...

शाहिद अजीज यांच्या या कबुलनाम्यामुळं पाकिस्ताननं आतापर्यंत केलेलं दावे धुळीस मिळाले आहेत. कारगील लढाईमध्ये पाक सैन्याची कुठलीही भूमिका नसल्याचा दावा वारंवार पाकिस्तान लढाईनंतर करत आलंय. कारगीलची लढाई ही दहशतवाद्यांनी केल्याचं पाकिस्तानचं म्हणणं होतं. मात्र लढाई करणारे हे पाकिस्तानी सैन्यच होते. याचे अनेक पुरावे भारताकडं होते. आतातर पाकिस्तानी सैन्यातील निवृत्त अधिका-यानं याचा खुलासा केल्यानं पाकिस्तान तोंडावर पडलाय.

अजिज यांच्या मतानुसार कारगिलच्या भूभाग हडप करण्याची ही असफल योजना होती. भारताकडून जोरदार प्रतिकार होईल याची अपेक्षा पाक सैन्यांना नव्हती. अजीज हे कारगिल लढाईवेळी आयएआयमध्ये एनालिसिस विंगचे मुख्य होते.

First Published: Sunday, January 27, 2013, 16:59


comments powered by Disqus