शहीद हेमराजचं शिर कापणाऱ्याला दिले पाक सैन्याने ५ लाख award for beheading Hemraj

शहीद हेमराजचं शिर कापणाऱ्याला दिले पाक सैन्याने ५ लाख

शहीद हेमराजचं शिर कापणाऱ्याला दिले पाक सैन्याने ५ लाख
www.24taas.com, नवी दिल्ली

पाकिस्तानच्या नीच कारवायांचं सत्य पुन्हा एकदा समोर आलं आहे. भारतीय सैनिक हेमराज याचं शिर कापून नेणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्याला पाकिस्तानी सैन्याने ५ लाख रुपये इनाम दिले आहेत.

८ जानेवारी रोजी नियंत्रण रेषा ओलांडून काही पाकिस्तानी सैनिक भारताच्या हद्दीत घुसले होते. मेंढर येथे त्यांनी दोन भारतीय सैनिकांची हत्या केली होती. तसंच त्यांचा शिरच्छेदही केला होता. त्यांतील लांस नाइक हेमराज याचं शिर कापून नेण्यात आलं होतं. हे कृत्य लष्कर-ए-तोएबाच्या आशिर्वादाने झालं असल्याचे आता उघड झालं आहे. अनवर खान नामक दहशतवाद्याने हेमराजचं शिर कापून पाकिस्तानात नेलं होतं. याबद्दल त्याला आयएसआय आणि पाकिस्तानी सैन्याने ५ लाख रुपये इनाम म्हणून दिले होते. हे आयबी आणि रॉच्या अहवालात उघड झालं आहे.

अहवालात दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी सरकार आणि आयएसआय़च्या अधिकाऱ्यांनी हा कट रचला होता. यात लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महंम्मद या संघटनांचे १५ दहशतवादी सामील होते. भारत-काश्मीर सीमेवरील सुभेदार जब्बार खान यांनी हे कृत्य करण्यात हातभार लावला होता.

First Published: Wednesday, January 30, 2013, 16:21


comments powered by Disqus