आग्ऱ्याचे ममनून बनणार पाकिस्तानचे राष्ट्रपती? Pakistan`s presidential candidate was born in Agra

आग्र्याचे ममनून बनणार पाकिस्तानचे राष्ट्रपती?

आग्र्याचे ममनून बनणार पाकिस्तानचे राष्ट्रपती?
www.24taas.com, झी मीडिया, आग्रा

सध्या आग्र्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पाकिस्तानातील सत्ताधारी पार्टी पीएमएलएनने ममनून हुसैन यांचं पाकिस्तानच्या राष्ट्रपतीपदासाठी घोषित केलं आहे. ममनून हुसेन यांचा जन्म आग्र्याला झाला होता. या गोष्टीबद्दल आग्र्याच्या रहिवाशांना आनंद झाला आहे. ममनून यांचे भारतातील एक परिचित असणारे मुबारक कुरेशी काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी ममनून यांच्या बालपणीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.

१९४० साली ममनून यांचा जन्म आग्र्याला झाला होता. फाळणीनंतर १९४८ त्यांचं कुटुंब कराचीला निघून गेलं. अजूनही आग्र्यामध्ये ममनून यांचे नातेवाईक तसंच मित्रमंडळी राहातात. ममनून पाकिस्तानचे राष्ट्रपती होऊ शकतात, हे समजताच त्यांना आनंद झाला. इ.स. १६०० च्या सुमारास ख्वाजा मोईनुद्दीन यांनी नाई मंडीमध्ये खोजा की हवेली नावाने स्थापन केलेल्या हवेलीत ममनून यांचं कुटुंब राहात होतं.

फाळणीनंतर ममनून यांचं कुटुंब पाकिस्तानात निघून गेलं. वयाच्या सातव्या वर्षांपर्यंत ममनून आग्र्यातच राहिले होते. या बालपमाच्या आठवणी त्यांच्या मनात आजही ताज्या आहेत. ममनून यांना आजही आग्र्यातील गल्लीबोळ आठवतात. तसंच आजही ते आग्र्याला आले की आपल्या नातेवाईकांना भेटतात. आग्र्याचा पेठा हा ममनून यांचा अतिशय आवडतो. ममनून यांचं राष्ट्रपती होणं जवळजवळ निश्चित आहे. ते जर राष्ट्रपती झाले तर आग्र्याचं बालपण लक्षात ठेवून भारतासोबत पाकिस्तानचे संबंध सुधारण्याचे प्रयत्न करतील, अशी आग्र्याच्या लोकांना आशा आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, July 29, 2013, 16:20


comments powered by Disqus