तालिबानच्या कॉल सेंटरवर धाड! Raid on Taliban`s call Center

तालिबानच्या कॉल सेंटरवर धाड!

तालिबानच्या कॉल सेंटरवर धाड!
www.24taas.com, झी मीडिया, लाहोर

पाकिस्तानातील लाहोरमध्ये तहरीक- ए- तालिबान (टीटीपी) द्वारे संचालित कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना अटक केलं आहे. पाकिस्तानातील विविध भागातील लोकांचं अपहरण करून त्यांच्या नातेवाईकांकडे खंडणी मागण्याचं काम या ठिकाणी कॉल सेंटरद्वारे चालत असे.

कॉल सेंटरवर टाकलेल्या छाप्यात नेमकं कितीजणांना अटक करण्यात आलं आहे, याबाबत पाकिस्तानी पोलिसांनी काही सांगण्यास नकार दिला आहे. मात्र पाच जणांवर आरोप आहे. याच कॉल सेंटरवरून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान यूसुफ रजा गिलानी यांचे मुलगे हैदर गिलानी आणि शाहबाज तासीर यांना सोडण्याच्या बदल्यात खंडणीसाठी फोन केले गेले होते.

लाहोरमधील जास्त लोकसंख्या असणाऱ्या ग्रीन हाऊस बागात हे कॉल सेंटर चालू होतं. पोलिसांनी या कॉल सेंटरमधून हत्यारं आणि स्फोटकंही जप्त केली आहेत. हे कॉल सेंटर म्हणजे इंटरनॅशनल टेक्निकल हब असल्याचं सांगण्यात येत आहे.

या कॉल सेंटरमधून फोन करण्यासाठी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील दुर्गम भागातील कोड नंबर वापरले जात होते. त्यामुळे फोन नेमका कुठून केला जात आहे, याची कल्पना येत नसे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, August 21, 2013, 19:13


comments powered by Disqus