गूड न्यूज: राज्यात आजपासून ‘ब्लड ऑन कॉल’

Last Updated: Tuesday, January 7, 2014, 18:15

रुग्णाला गरजेनुसार वेळीच रक्त मिळालं तर त्याचे प्राण वाचू शकतात. पण अनेकदा आवश्यक गटाचं रक्त मिळवताना बरीच धावपळ करावी लागते. आता या धावपळीतून सुटका होणार आहे. फक्त १०४ क्रमांक डायल केल्यावर मोटरसायकलवरून रुग्णापर्यंत रक्त पोहोचवणारी ‘ब्लड ऑन कॉल’ योजना आजपासून संपूर्ण राज्यभरात सुरू होतेय.

तालिबानच्या कॉल सेंटरवर धाड!

Last Updated: Wednesday, August 21, 2013, 19:13

पाकिस्तानातील लाहोरमध्ये तहरीक- ए- तालिबान (टीटीपी) द्वारे संचालित कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना अटक केलं आहे. पाकिस्तानातील विविध भागातील लोकांचं अपहरण करून त्यांच्या नातेवाईकांकडे खंडणी मागण्याचं काम या ठिकाणी कॉल सेंटरद्वारे चालत असे.

... @ ब्लाईंड कॉल सेंटर

Last Updated: Thursday, July 12, 2012, 13:17

कॉल सेंटरवर कादंबऱ्या लिहिल्या गेल्या... चित्रपटदेखील आले. मात्र, एका वेगळ्या कॉल सेंटर सध्या पुण्यात पाहायला मिळतंय... हे आहे अंध व्यक्तींचे कॉल सेंटर. टेलिफोन क्षेत्रातील मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीचं काम अंधांच्या कॉल सेंटरला मिळाले आहे. अंध व्यक्तीच या कॉल सेंटरचे सर्व काम यशस्वीपणे हाताळत आहेत.

दी बर्निंग कार!

Last Updated: Tuesday, July 10, 2012, 09:31

मुंबईत रात्री एका कॉल सेंटरच्या गाडीनं अचानक पेट घेतला. ही आग इतकी जबरदस्त होती की क्षणार्धात ही गाडी जळून खाक झाली. सुदैवानं यातून ड्रायव्हर बचावला.