Last Updated: Wednesday, November 20, 2013, 08:51
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईजगविख्यात हास्यअभिनेते मि. बिन म्हणजेच अभिनेते रोवन एटकिंसन यांनी आत्महत्या केल्याची बातमी सध्या सोशल साईट्सवर पसरलीय. मात्र ही अफवा असल्याचं स्पष्ट झालंय.
रोवन एटकिंसन या ५८ वर्षीय हास्यकलाकाराला `जॉनी इंग्लिश ३` या चित्रपटाच्या निर्मात्यानं तडकाफडकी चित्रपटातून काढून टाकल्यानं त्यानं नैराश्य आल्यानं आत्महत्या केल्याचं सोशल मीडियावर पसरलेल्या बातमीत म्हटलंय.
मात्र, त्यानं असं काहीही केलं नसून, त्याची प्रकृती चांगली आहे. त्यामुळं मि. बिनच्या आत्महत्येच्या बातमीवर मुळीच विश्वास ठेवू नका.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, November 20, 2013, 08:51