अमेरिकेला धुडकावून रशियाने युक्रेनमध्ये सैन्य घुसवले, Russia military in Ukraine

अमेरिकेला धुडकावून रशियाने युक्रेनमध्ये सैन्य घुसवले

अमेरिकेला धुडकावून रशियाने युक्रेनमध्ये सैन्य घुसवले
www.24taas.com, वृत्तसंस्था वॉशिंग्टन

युक्रेनमधील अस्थिरता लक्षात घेऊन रशियाने आपले सैन्य घुसवले. जगातून रशियाच्या या निर्णयाला विरोध होत आहे. अमेरिकेने विरोध करताना चिंता व्यक्त केलेय. आपले सैन्य युक्रेनमध्येच राहिल, असे स्पष्ट संकेत रशियाने दिलेत. दरम्यान, युक्रेन समस्येचा परिणाम रशियाच्या आर्थिक परिस्थितीवर झालाय. रशियाचा शेअरबाजार कोसळला आहे.

क्रिमियात रशियाने आपले सैन्य मोठय़ा प्रमाणावर घुसवले असून, शीतयुद्धानंतर रशिया व पाश्‍चिमात्य देश यांच्यातील सर्वात मोठा वाद निर्माण झाला आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री लावरोव यांनी रशियन सैन्य युक्रेनमध्येच राहणार अशी घोषणा केली आहे.

दरम्यान, रशियाच्या या भूमिकेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. रशिया युक्रेनमधील राष्ट्रवादी अतिरेक्यांच्या विरोधात मानवी हक्कांचे संरक्षण करत असल्याचा दावा रशियाचे संरक्षणमंत्री सर्जी लावरोव यांनी केला आहे. त्यामुळेच हे सैन्य घुसविण्यात आल्याचे रशियाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

रशियाच्या या भूमिकेनंतर तीव्र विरोध होत आहे. याप्रश्नी लावरोव आज संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांची भेट घेणार आहेत, रशियाने आक्रमक वृत्तीला लगाम घालावा आणि आपले सैन्य माघारी घ्यावे असे लावरोव यांना सांगण्याचे बान यांनी ठरविले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी युक्रेन मुद्यावर ब्रिटन, पोलंड आणि र्जमनीच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. रशियाने युक्रेनमधील सार्वभौमत्वाचे उल्लंघन केल्याबद्दल चिंता व्यक्त केलेय. तर जपानने युक्रेनमधील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. नाटो राष्ट्रांनी युक्रेनमध्ये आंतरराष्ट्रीय दूत पाठवावा आणि रशियाला सैन्य मागे घेण्यास भाग पाडावे करावे, असे म्हटले आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, March 4, 2014, 10:58


comments powered by Disqus